WhatsApp

MNS मनसेची काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर नाराजी; निवडणूक आयोगाकडे तक्रार, न्यायालयाची धमकी

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३० एप्रिल :- महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नवा वादग्रस्त मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS (मनसे) यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘पंजा’ चिन्हावर आक्षेप घेतला असून, निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयात जाण्याची धमकीही देण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे संपूर्ण देशाचेच राजकीय चित्र बदलले आहे. यामुळे अन्य राजकीय पक्षांनाही चिंता वाटू लागली आहे की आपल्यालाही अशीच वेळ येईल काय? अशा पार्श्वभूमीवर MNS मनसेनेही सतर्कतेचा मार्ग स्वीकारला आहे.

MNS मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करत काँग्रेसचा ‘पंजा’ चिन्ह बदलण्याची किंवा पोलिस दलाच्या चिन्हातील पंजा काढून टाकण्याची मागणी केली आहे. तावरे यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस दलाच्या चिन्हातही पंजा आहे आणि काँग्रेसचेही चिन्ह पंजाच आहे. निवडणुकीच्या काळात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो. अशावेळी हे दोन्ही चिन्ह एकाच वेळी वापरले जाणार असल्याने निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होत आहे.

यानंतर एबीपी माझाने या बातमीचे वृत्त दिले असून, आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. MNS मनसेकडून असा आक्षेप घेतल्यास अन्य पक्षांच्या चिन्हांवरही आक्षेप येऊ शकतात अशी भीतीही वर्तविण्यात येत आहे.

मनसेने गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता. परंतु यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेश राज ठाकरे यांनी MNS मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजप-शिंदे गटासोबतच्या चर्चेवेळी शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर जागा लढविण्याची अट घातल्याने, मनसेच्या स्वतःच्या चिन्हाविषयी प्रश्न निर्माण झाला होता.

अशा परिस्थितीत मनसेने आता काँग्रेसच्या चिन्हावरच टीका करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. निवडणूक आयोगाकडून विषयावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. न्यायालयातही या प्रकरणावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!