WhatsApp

masanya ud was found in akola अकोल्यात भरवस्तीत आढळला मसन्या उद , रेस्क्यू टीमने केले सुरक्षित

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो अकोला दिनांक १९ मार्च :- आज दिनांक 19 मार्च 2024 रोजी अकोल्यातील डाबकीरोड परिसरात एका मसन्या उधाणे (masanya ud) मुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मसन्या उधाण हे दुर्मिळ आणि संरक्षित प्राणी असल्याने त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन विभागाची मदत घेण्यात आली.

वन विभागाचे उपवनसंरक्षक (डीएफओ) डॉ. कुमारस्वामी यांनी तात्काळ रेस्क्यू टीम पाठवण्याचे आदेश दिले. रेस्क्यू टीममध्ये मानद वन्यजीव बाळ काळणे, वनरक्षक वनिता तायडे, चालक यशपाल इंगोले, चालक आलासिंग राठोड आणि अक्षय पांढरे यांचा समावेश होता.

घटनास्थळी पोहोचल्यावर मसन्या उधाणे झाडावर आणि घरावर चढून लोकांना पळवत होते. बाळ काळणे यांनी त्याला कुशलतेने पकडून पिंजऱ्यात बंद केले. मसन्या उधाणे हे रात्रीचे प्राणी असतात आणि त्यांचे दात फार तीक्ष्ण असतात. ते स्मशानभूमीत मृतदेह खाऊन स्वच्छता राखण्यास मदत करतात.

masanya ud निसर्गाचा स्वच्छता दूत

मसन्या ऊद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. त्याच्या आंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या शरीरा इतकीच त्याची शेपटीसुद्धा लांब असते हा प्राणी फळे, मांस, किडे खातो. तसेच दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीला किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. हा दुर्मिळ वन्यजीव सहसा स्मशानभूमीजवळ आढळतो, असे बाळ काळणे यांनी सांगितले.

बाळ काळणे यांनी गेल्या 20 वर्षात 20 हून अधिक मसन्या उधाणांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याचे काम केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर आशिष शिरसाट, संदीप भाडे, पंकज शिरसाट, अजय नावकर, बुद्धभुषण ढवळे, अजिंक्य शिरसाट, राहुल गवई आणि विवेक दामोदर या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वन विभागाला मदत केली.

Leave a Comment

error: Content is protected !!