WhatsApp

Maharashtra Assembly Election मोठी बातमी! मोठी बातमी ! निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, राजकीय वर्तुळाचं लक्ष; कोणती घोषणा करणार?

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १६ ऑगस्ट २०२४ :- Haryana-Maharashtra Assembly Election । केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करणार आहेत. दरम्यान, बहुतेकांचे डोळे जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहेत, कारण कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच याठिकाणी मतदान होणार आहे.

दुपारी ३ वाजता विधानसभेच्या तारखा जाहीर करणार Maharashtra Assembly Election

निवडणूक आयोगातर्फे आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून, त्यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पाच ते सात टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सुरक्षेबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निवडणुकीची तयारी सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या टीमची हरियाणा आणि जम्मू-काश्मीरला भेट Maharashtra Assembly Election

अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. निवडणूक आयोगाच्या टीमने 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान केंद्रशासित प्रदेशाचा दौरा केला होता, त्यानंतर तो हरियाणाला गेला होता. टीमने गृह सचिव अजय भल्ला यांची भेट घेतली होती, ज्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत विधानसभांबाबत बोलले आहे. अशा परिस्थितीत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी निवडणुका व्हाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले असल्याने या मुद्द्यालाही बळ मिळाले आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू असून सरकारलाही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागत आहे. यामुळे ती केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतात. दुसरीकडे, हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे. अशा परिस्थितीत कार्यकाळ संपण्यापूर्वीच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!