WhatsApp

Lok Sabha Elections अकोल्यात सीमा सुरक्षा दलाची कंपनी दाखल, लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो ११ मार्च २०२४: आगामी लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections शांततेने आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाची (एसएसबी) कंपनी दाखल झाली आहे. या कंपनीसोबत एक अधिकारी आणि ७१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी एसएसबी जवानांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

एसएसबी कंपनीचे नेतृत्व सहायक समादेशक विकास चंद्रा हे करीत आहेत. कंपनीत अधिकारी आणि ७१ जवानांचा समावेश आहे. आगामी काळात आणखी जवान दाखल होणार आहेत.

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections संबंधी लोकसभा मतदारसंघातील भौगोलिक, सामाजिक, राजकीय, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी बाबींवर एसएसबी जवानांना मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली.

आगामी काळात जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी एसएसबीकडून रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचे प्रदर्शन करण्यात येईल. याद्वारे आगामी लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections शांततेने आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

एसएसबी जवानांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि एसएसबीच्या संयुक्त सहकार्याने निवडणूक शांततेने पार पाडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!