Ladki Bahin Yojana अर्रर्रर्र देवा ! या महिलांना मिळणार नाही 1500 रूपये महिना योजनेसाठी या महिला अपात्र !

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो,दि.०२ जुलै २०२४ : Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे.

मात्र या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळू शकतो? तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होऊ शकतात. यासाठी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने अंतरीम अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत पात्र Ladki Bahin Yojana असलेल्या महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये DBT द्वारे बॅक खात्यात जमा केले जाणार आहे. 28 जुन रोजी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेत कोणत्या महिला अपात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहुया.

Ladki Bahin Yojana या महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र ; अपात्र महिलांची यादी खालीलप्रमाणे आहे.

1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.

4) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

Ladki Bahin Yojana वरील यादीमधील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!