अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १८ जुलै २०२४ :- Ladka Bhau Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यामातून तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये सहा महिन्यांसाठी मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.
तसेच तरुणांना सरकारकडून पात्र तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे. या Ladka Bhau Yojana योजनेचा लाभ नेमकं कोणत्या तरुणांना मिळणार नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही योजना तीन भागात विभागली गेली आहे. या योजनेतून 12 वी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. तर आय.टी.आय तथा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 8 हजार रुपये विद्यावेतन आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 रुपये विद्यावेतन मिळणार आहे.
- Ladka Bhau Yojana योजनेचा ‘या’ तरुणांना लाभ होणार नाही
या योजनेचा 18 पेक्षा कमी वयाच्या तरुणांना आणि 35 पेक्षा जास्त वय असणाऱ्या तरुणांना लाभ मिळणार नाही - शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सरकारी तसेच खासगी ठिकाणी काम करत असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- केवळ बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- 12 वी उत्तीर्ण नसलेल्या किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या तरुणांचं बँक खातं आधारकार्डला जोडलेलं नसेल त्यांना या योजनेपासून मुकावं लागू शकतं.
- जे तरुण मूळचे महाराष्ट्राचे नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- ज्या तरुणांना कागदपत्रांची पूर्तता करता येणार नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
तर ‘हे’ तरुण विद्या वेतनास पात्र राहणार नाहीत
या Ladka Bhau Yojana योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS /MAPS) पूर्ण केलेले आणि करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
Ladka Bhau Yojana ऑनलाईन अर्ज कसा करावा?
तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल. तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल. यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल. अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
Ladka Bhau Yojana ऑफलाईन अर्ज कसा करावा?
महाराष्ट्रातील तरुण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन देखील अर्ज करु शकणार आहेत. सर्वात आधी तरुणांना महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे अर्ज डाऊनलोड करण्याच्या बटनवर क्लिक करावं लागेल. त्या अर्जाची प्रिंट काढावी लागेल. यानंतर तो अर्ज पूर्ण भरावा लागेल. तसेच तो अर्ज नेमका जमा कुणाकडे करावा याबाबतही माहिती दिलेली असेल. त्यानुसार तो अर्ज संबंधित ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागेल.
Ladka Bhau Yojana कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुण देणार आहे. तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहेत.
- यातील 12 उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार रुपये मिळतील.
- आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये मिळतील.
- पदवीधर तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये पैसे सरकारकडून मिळणार आहेत.
- सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
- या योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत? Ladka Bhau Yojana
या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा. - दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
- तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
- संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल.
- तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं
- योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? Ladka Bhau Yojana
- आधारकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक