सलमान खानवर चाकूने हल्ला लहान मुलांच्या भांडणावरुन. रिसोड पोलिसांकडून चौघांना अटक

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ४ मार्च २०२४ :- लहान मुलाला मारल्याचे कारणावरून झालेल्या वादातून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री रिसोड शहरातील अमरदास नगरात घडली. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरदास नगर येथील रहिवासी अमिना खातून इम्रान खान यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा मन्सूर खान हा गल्लीत खेळत होता. तो रडत रडत घरी आला आणि त्याने सांगितले कि,फैजान शाहने त्याच्या गालावर चापट मारली.

जेव्हा ती तिचा दीर सलमान खान सोबत फैजान शाह अन्वर शाहच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली असता तेव्हा तिथे पुन्हा वाद सुरू झाला, हा वाद इतका वाढला की, अन्वर शाह, फैजान शाह, रिहान खान, अरबाज खान, शाहबाज खान यांनी सलमान खानला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी फैजान शाह याने जवळील चाकू काढून सलमान खानच्या पोटात वार केला आणि चौघेही तेथून पळून गेले. परिसरातील लोकांनी सलमान खानला जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले. पोलिसांनी कलम गुन्हा दाखल करून चारही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!