WhatsApp

अभिमानाची बाब अकोला येथील 50 बालवैज्ञानिकांची ‘INNOVATION CONCLAVE’साठी निवड!

अकोला: शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद, अकोला आणि पाय जाम फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘INNOVATION CONCLAVE’ मध्ये अकोल्यातील 50 निवडक बालवैज्ञानिक आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सहभाग होणार आहे. बुधवार, दिनांक 20 मार्च 2024 रोजी YCMA, पुणे येथे आयोजित या कार्यशाळेत डिझाइन थिंकिंग, प्रोब्लेम सॉल्विंग आणि तंत्रज्ञानाचा प्रोटोटाइप बनविण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सहभाग. गेल्या तीन वर्षांपासून INSPIRE AWARD MANAK स्पर्धेत अकोला जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि मागील वर्षी दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभागही घेतला होता.

या यशाचा पाठपुरावा करत पाय जाम फाउंडेशन, पुणे यांच्या मदतीने 50 बालवैज्ञानिक आणि शिक्षकांना ‘INNOVATION CONCLAVE’ मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमासाठी श्री. शुभम बडगुजर, प्रोग्राम मैनेजर, पाय जाम फाउंडेशन, पुणे; श्री. ऋग्वेद ऐनापुरे, वरिष्ठ सल्लागार, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला आणि डॉ. रवींद्र भास्कर, जिल्हा समन्वयक, INSPIRE AWARD MANAK यांच्या सहकार्याने डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद, अकोला यांनी पुढाकार घेतला आहे.

या प्रसंगी श्रीमती वैष्णवी बी (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘INNOVATION CONCLAVE’ चा लाभ घेऊन सध्याच्या Artificial Intelligence च्या युगात भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्य) यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विश्वास जढाळ, श्री. मुरलीधर थोरात, श्री सुनिल वावगे, श्री. संतोष जाधव, श्री. देवानंद मुसळे, श्री. विलास घुंगड, श्री प्रभु चव्हाण, श्री मनीष निखोड, श्री विजय पजई, श्री शशिकांत बांगर आणि श्री. सुमेध मनवर हे सहकार्य करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!