India Vs Australia CWC 2023 क्रिकेटप्रेमी अकोलेकर सज्ज; आजच्या भारत vs ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी

ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून पहिले बॉलिंग घेणार असल्याचा अकोला न्युज नेटवर्कचा अंदाज

अकोला न्युज नेटवर्क डेक्स :- India Vs Australia CWC 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज (रविवारी) रंगणारा एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी अकोलेकरांनी जय्यत तयारी केली आहे. हा महामुकाबला मोठ्या पडद्यावर पाहता यावा, यासाठी विविध ठिकाणी विशेष व्यवस्था देखील केली असून, हॉटेल-रेस्तराँमध्येही मोठे पडदे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाच्या विजयासाठी अकोलेकरांचे आराध्यदैवत राज राजेश्वराला साकडे घालण्यात आले आहे.

अहमदाबादेतील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात महामुकाबल्याची जबरदस्त ‘क्रेझ’ अकोल्यात सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. दुपारी दीड वाजता टॉस आणी दोन वाजता एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी अकोलेकर आधीच टीव्ही मोबाईल घेऊन बसले होते रविवारचा दिवस आणी त्यात वल्डकप चा अंतिम सामना तो देखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलीय. गेल्या 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहतायत तो आता काही तासांवर आलाय. क्रिकेटप्रेमींना सामन्याचा आनंद घेता यावा, यासाठी शहरात अनेक ठिकाणी विशेष तयारी केली जात आहे. या सामन्याचा आनंद ग्राहकांसह सर्वांना मुक्तपणे लुटता यावा यासाठी त्यांनी मोठमोठे एलईडी स्क्रीन लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच काही व्यापारी मंडळींनी थेट मंडप टाकून ‘स्क्रीन्स’ लावण्याची तयारी सुरू केली आहे. क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी ढोल-ताशे, फटाके, ध्वनियंत्रणा, तिरंगी ध्वज, टॅटूचीही सोय करण्यात आली आहे.

रेस्तराँ’मध्ये सवलतींचा वर्षाव India Vs Australia CWC 2023

शहरातील अनेक हॉटेल-रेस्तराँचालकांनी अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणासाठी मोठे पडदे लावले असून, क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थ व मद्य खरेदीवर काही टक्के सवलत, एका डिशवर एक डिश फ्री अशा सवलतींचा समावेश आहे. आप्तस्वकीय व मित्रमंडळींसोबत एकत्र बसून सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी जिल्ह्यात फार्महाउस बुकिंगला मोठी पसंती दिली आहे.

भारताची बाजू वरचढ का? India Vs Australia CWC 2023

फायनलपूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजीची ‘पॉवर’ सर्वांनी पाहिलीय. या दोन्ही सामन्यात प्रत्येकी 2 फलंदाजांनी शतक झळकावलंय. रोहित शर्मा सातत्यानं आक्रमक सुरूवात करुन देतोय. शुबमन गिलचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील रेकॉर्ड जबरदस्त आहे. फायनलमधील पहिल्या दहा ओव्हर ही जोडी कशी खेळणार? यावर भारतीय टीमचं भवितव्य निश्चित होणार आहे.

टीम इंडियाची मधली फळी देखील फॉर्मात आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि वन-डे क्रिकेटमध्ये 50 शतक हे दोन्ही विक्रम विराटनं सेमी फायनलमध्ये नोंदवलेत. त्यानं या स्पर्धेत 10 पैकी 8 वेळा पन्नाशीचा टप्पा ओलांडलाय. तर, 3 वेळा शतक झळकावलंय. श्रेयस अय्यरनं मागच्या 4 सामन्यात दोन सलग शतकांसह 392 धावा केल्यात. तर के.एल. राहुलची या स्पर्धेतील सरासरी 75 पेक्षा जास्त आहे. 2003 च्या फायनलमध्ये भारताला हरवणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये ग्लेन मॅग्रा आणि ब्रेट ली होते. यंदा भारताकडं जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी आहेत. मोहम्मद सिराजही त्यांना तोलामोलाची साथ देतोय.

फिरकी गोलंदाजीपुढं गोंधळण्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा इतिहास आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा सज्ज आहेत.

या निर्णायक क्षणानं मागच्या दहा वर्षात हुलकावणी दिलीय. अखेर ही प्रतीक्षा संपणार आणी भारत विश्वचशक जिंकणार हाच दृढ निश्चय घेऊन भारतीय संघ मैदानात उतरणार अंतिम सामन्याचा रोमांच अनुभवण्यासाठी अकोलेकरांनमध्ये जबरदस्त उत्साह आहे. आणी अकोलेकर त्यांना चेरिंग करणार या ऐतिहासिक क्षणाचा भागीदार होण्यासाठी सर्वच अकोलेकर सज्ज दिसून येत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!