WhatsApp

अकोला कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला दुप्पट दंड

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ :- अकोला जिल्ह्यातील एका चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने आरोपी सौ. नंदा मोहनराव हरणे यांना दोषी ठरवून धनादेशाच्या रकमेची दुप्पट रक्कम दंड म्हणून थोटावली आहे. या निर्णयाने आर्थिक व्यवहारात विश्वासाचे महत्त्व आणि कायद्याचे पालनाची गरज अधोरेखित केली गेली आहे.

फिर्यादी गोपाल विष्णु नागपुरे यांनी आरोपींच्या मुलाला वाहन विक्रीच्या सौद्यासाठी २,८०,००० रुपये दिले होते. मात्र, ठरलेल्या कालावधीत वाहनाचा ताबा मिळाला नाही आणि रक्कम परतावीच्या मागणीवर आरोपींनी धनादेश दिला, जो निधी अपुरा असल्याने बाऊन्स झाला.

न्यायालयाने या प्रकरणात वि. ६वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री व्ही. एस. खांडबहाले यांच्या समक्ष झालेल्या युक्तिवादानंतर आरोपी सौ. नंदा मोहनराव हरणे यांना दोषी ठरवले. धनादेशाच्या रकमेची दुप्पट रक्कम दंड म्हणून थोटावून, दंड न भरल्यास दोन महिन्याचा सादा कारावासाची शिक्षा सुनावली.फिर्यादी तर्फे अँड. धीरज मोहन शुक्ला यांनी सक्षमपणे बाजू मांडली. या निर्णयाने चेक बाऊन्स प्रकरणातील कडक कायदेशीर कारवाईचे महत्त्व आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता आणि विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!