Highway Inauguration Nitin Gadkari अकोला जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी अकोट – अकोला रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण करणार – नितीन गडकरी

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

अकोला न्युज नेटवर्क :- Highway Inauguration Nitin Gadkari जिल्ह्यात शेगाव- देवरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी १०० कोटी, बार्शीटाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी १३५ कोटी, तसेच अकोला-अकोट- गांधीग्राम रस्त्यावर पूर्णा नदीवर पुलासाठी ७० कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मूर्तिजापूर येथे केली. अकोट- अकोला रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. Highway Inauguration Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाचे लोकार्पण व कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, भावना गवळी, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, प्रताप अडसड, वसंत खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, अकोट- अकोला रस्त्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करून हा रस्ता तीन-चार महिन्यात पूर्ण केला जाईल. चौपदरी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण झाला. कोलकात्यापासून गुजरातपर्यंत विविध मार्गांशी हा महामार्ग जोडलेला आहे. एकूण सात हजार कोटी रू. निधीतून रस्तेविकासाला चालना मिळाली आहे. दळणवळणाची उत्तम सुविधा निर्माण झाल्याने उद्योग, व्यापाराबरोबरच शेतीविकासालाही गती मिळेल.

akola nitin gadkari
akola nitin gadkari

कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी सिंचन, पशुधन व पूरक व्यवसायांचा विकास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतीविकासासाठी पाण्याची साठवणूक होणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात नदी खोलीकरण व जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात व्हावीत. आवश्यक तिथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सहकार्य केले जाईल. विदर्भात ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धव्यवसाय विकास, खारपाणपट्ट्यात झिंगे संवर्धनाचा व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शेतकरी बांधवांनी अशा पूरक व्यवसायांकडे वळावे. विदर्भात पशुखाद्य निर्मितीचे ४० कारखाने निर्माण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. बोंडे, श्रीमती गवळी, आमदार श्री. सावरकर,श्री. पिंपळे, श्री. भारसाकळे, श्री. पाटणी, श्री. अडसड आदींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. गडकरी यांच्या हस्ते विक्रमी वेळेत महामार्ग पूर्ण करणाऱ्या अभियंता, तंत्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती- चिखली पॅकेज एकमध्ये ९१२.४१ कोटी निधीतून राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड या ५४ किमी लांबीचा रस्ता, तसेच पॅकेज दोनमध्ये ८१७.३५ कोटी रू. निधीतून कुरणखेड ते शेळद हा ५० किमी लांबीचा रस्ता विक्रमी वेळेत निर्माण करण्यात आला आहे. या संपूर्ण कामांचे निर्मिती मूल्य १७२९.७६ कोटी रू. आहे. त्याचप्रमाणे, कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या २६.०८ कि. मी. रस्ता निर्माण करण्यासाठी ५९४.४४ कोटी रू. निधीची तरतूद आहे.

akola news Facebook page
akola news Facebook page

Leave a Comment

error: Content is protected !!