WhatsApp

सावधान! या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १० एप्रिल २०२४ :- विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याचं चित्र दित आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून,वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे. तसेच 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

akola news whatsapp group

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. तसेच वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस सुरु
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. यामुळं काही भागात शेती पिकांना फटका बसला आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. .आंबा, लिंबू, भाजीपाला, ज्वारी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं या अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातहच अवकाळी पावसासह गारपीट सुरु आहे. तसेच काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखी घडल्या आहेतय दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, अशा स्थितीतच हवामान विभागानं पुन्हा राज्याततील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.(ann news network)

Leave a Comment

error: Content is protected !!