अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो :- Heat Wave अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र स्वरूप धारण केली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू करून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी 25 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 25 मे ते 31 मे या कालावधीसाठी कलम 144 लागू करण्यात आली आहे. Heat Wave प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान जिल्ह्यात 44 ते 45.8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
अतिउष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि विद्यार्थी यांना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचे आदेशात नमूद केले आहे. Heat Wave कामगारांना सेवा पुरवणे, खासगी वर्गांच्या वेळेत बदल करणे, आदी उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अंगमेहनतीच्या कामावर असलेल्या कामगारांकडून उन्हात काम घेता येणार नाही. त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षणासाठी शेड, पंखे, कुलर्स आदींची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पिण्याच्या पाण्याची आणि प्रथमोपचाराची सोय करणेही आवश्यक असेल. याबाबत कसूर झाल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल.
खासगी शिक्षण संस्थांनाही कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 नंतरच वर्ग घेता येतील. मध्यंतरीच्या कालावधीत वर्ग घ्यावयाचे असल्यास तेथे पंखे, कुलर्स इत्यादी व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
जिल्हा प्रशासनाच्या या उपाययोजनांचा उद्देश नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करणे हा आहे. अनुचित रितीने ही आदेश पाळली नाहीत, तर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. अकोल्यातील उष्णतेची लाट यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने कालांतराने परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जातील, असे समजते.