हनुमान जयंतीच्या पूर्वसंद्येवर महानगरात निघणार हनुमान जन्मोत्सवाची भव्य शोभायात्रा

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १९ एप्रिल २०२४ :- उपक्रम व भव्य शोभायात्रा आयोजित करणाऱ्या हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने घावर्षी ही हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येवर महानगरात हनुमंताची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून यामध्ये चालती फिरती हनुमंताची झाकी तथा बाल हनुमंत वेशभूषा स्पर्धा हे पा उत्सवाचे आकर्षण राहणार असल्याची माहिती हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

akola news whatsapp group
akola news whatsapp group

स्थानीय वेलकम सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत हनुमान जन्मोत्सव समितीचे मुख्य संयोजक अविनाश देशमुख, समितीचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवी रामप्रकाश मिश्रा, मार्गदर्शक माजी आ बबनराव चौधरी, बाल मुकुंद भिरड, समितीचे पदाधिकारी पंकज साबळे, सागर कावरे, अरविंद शुक्ला, मनोज शाहू, मनोज बिसेन, सौ पूजा काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रात येत्या 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येत आहे. या हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येवर दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता राजराजेश्वर मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहोचून येथे पूजन व महाआरतीने या शोभायात्रेचे भक्तिभावात समापन करण्यात येणार आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्त समितीच्या वतीने बच्चे कंपनीसाठी मोफत बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही वेशभूषा स्पर्धा गांधी चौक येथे समितीच्या स्वागत पेंडॉल मध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये विजेत्या बाल स्पर्धकास रोख 5 हजार रुपये तथा उपविजेत्या बालकास रोख 3 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार असून सहभागी सर्व बालकांना सहभाग पत्रे बहाल करण्यात येणार आहेत. सोळा वर्षे वयोगटाच्या आतील बालकांनी या स्पर्धेसाठी दिनेश लोहकार 9604443428, अंकुश तवर 9372052616 यावर संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आकर्षक अशा शोभायात्रेत हनुमंताच्या प्रतिमेस रथात विराजमान करून हा रथ भक्ताद्वारे ओढण्यात येणार आहे. तसेच शोभायात्रेत चालती फिरती हनुमंताची सजीव झाकी हे आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. शोभायात्रा मध्ये दोनशे महिला भजनी मंडळ, दोनशे टाळकरी मंडळ व रामनामाचा गजर करीत असणाऱ्या महिलांच्या विशेष चमू राहणार आहेत. महानगराच्या शक्ती व भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमंताच्या या भव्य शोभायात्रेत महानगरातील हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही शोभायात्रा यशस्वी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उत्सवास रमाकांत खेतान, प्रा संतोष हुशे अजय गावंडे, आनंद वानखडे, राजेश राऊत, आकाश कवडे, अंकुश भेंडेकर, विशाल डीक्कर, योगेश बुंदेले, निशिकांत बडगे, पराग कांबळे, विनोद नालट, अश्विन पांडे, दत्ता देशमुख, आशीष ढोमणे, गोविंद बागडी, गणेश कळसकर, एड ओम खंडारे, संजय देशमुख, अश्विन देशमुख, अंकुर तायडे, कार्तिक पोदाळे, निशांत जाधव, प्रकाश जडिया, आकाश ठाकूर ऍड अनिल शुक्ला, निरंजन चव्हाण, राजाराम मात्रे, सागर पिंपळे, प्रितेश ठाकरे, गजानन ढोरे, धीरज देशमुख, विनोद मराठे, संगीता आत्राम, जया देशमुख, सविता आढाव वर्षा शिंदे, वंदना गोमासे, आकांक्षा गोमासे समवेत हनुमान जन्मोत्सव समितीचे समस्त पदाधिकारी सेवाधारी व व कार्यकर्ते आदी करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!