अकोला न्युज नेटवर्क दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ :- सोन्याने या आठवड्यात कमाल केली. बुधवारी सोने जोरदार आपटले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), एकाच दिवसात सोन्याच्या किंमती 800 रुपयांनी घसरल्या. बऱ्याच दिवसानंतर एकाच दिवशी असा निच्चांक सोन्याने गाठला. चांदीत या महिन्यात चढउताराचे सत्र असले तरी, या धातूने पण ग्राहकांची चांदी केली आहे. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी भाव उतरले. तर चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली होती. डिसेंबर 2023 मध्ये या धातूंनी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. किंमतीतील या अपडेटनंतर कसा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 15 February 2024)
सोन्यात झाली घसरण
फेब्रुवारीत सोने कालपर्यंत जवळपास 920 रुपयांनी स्वस्त होते. त्यात बुधवारी 680 रुपयांच्या घसरणीची भर पडली. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. तर 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने दिला दिलासा
फेब्रुवारीत आतापर्यंत चांदी 1200 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी स्वस्त झाली. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत मोठी पडझड झाली. 24 कॅरेट सोने 61,590 रुपये, 23 कॅरेट 61,344 रुपये, 22 कॅरेट सोने 56,416 रुपये झाले. 18 कॅरेट 46,192 रुपये, 14 कॅरेट सोने 36,030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,150 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.(AKOLA ANN NEWS NETWORK)