ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट निवडणुक मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

अकोला : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूक 2023 करीता निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 14 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व 38 ग्रामपंचायतीची पोट निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूक कार्यक्रम रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान व सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात नमूद केल्यानुसार ग्रापपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्‍यापासून निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितपणे जमाव होवू नये व कोणत्याही प्रकारचे वाद, तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून अकोला जिल्ह्यात मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात मतदान प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध करण्‍यात येत आहे. जो कोणी या नियमांचे उल्‍लंघन करील तो इसम तथा शस्‍त्र परवानाधारक दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरेल.

ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे.

ज्‍या ठिकाणी निवडणूक साहित्‍य कक्ष (STRONG ROOM) आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहिर करून त्यास प्रसिध्द करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!