WhatsApp

मतदान हे आपले कर्तव्य – डॉ.मेघना वासनकर,उपायुक्त,मनपा अकोला…मतदान करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १९ एप्रिल २०२४ :- मतदान हे आपले कर्तव्य असून येणाऱ्या 26 एप्रिल 2024 रोजी होऊ घातलेल्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी शिक्षण विभाग द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा व पालक मेळाव्यात केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्‍या अनुषंगाने अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारा SVEEP (Run For Democracy) उपक्रमामध्ये मनपा स्तरावर अकोला लोकसभा मतदार संघात मतदान जनजागृती करिता मनपा द्वारा विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. मागील आठवड्यात मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान जनजागृती साठी काढलेली मोटरसायकल रॅली लक्षवेधी ठरली होती.मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या आदेशान्‍वये तसेच मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनात मनपा शिक्षण विभागाद्वारे मतदान जनजागृती अभियान अंतर्गत मनपा सेमी इंग्रेजी शाळा क्रमांक 7 रामदास पेठ येथे चित्रकला स्पर्धा व पालक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, प्रकल्प अधिकारी नरेश बिल्लेवार व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला निवडणूक विभागातील किशोर चतरकर यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे स्पर्धेत परीक्षक म्हणून सुभाष धार्मिक, प्रशांत शेवतकर, उमेश बंडोपंत जोशी, अमर लोलूपसिंग देशमुख यांची उपस्थिती लाभली. चित्रकला स्पर्धा दोन गटात घेण्यात आली असून वर्ग 3 री ते 5 वी अ गट व वर्ग 6 ते 8 वी ब गट असे होते. मनपा अधिनस्त सर्व शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांचे कौतुक केले तसेच भारताची लोकशाही अधिक बळकट करण्‍यासाठी प्रत्‍येक मतदारांनी आपल्‍या मतदानाचा हक्‍क 100 टक्‍के बजावणे अत्‍यंत गरजेचे असून 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडण्‍याचे आवाहन मनपा उपायुक्‍त यांनी यावेळी केले.

याकार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत मनपा द्वारा विकसित करण्यात आलेल्या आंब्याचे रोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहायक शिक्षिका अनिता नवलकर व नयना गोटे यांनी तर प्रास्ताविक प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांनी व आभार प्रदर्शन हरिश्चंद्र ईटकर मुख्याध्यापक मनपा शाळा क्रमांक 7 अकोला यांनी केले. उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी मतदान शपथ घेतली. उपरोक्त कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या करिता प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात, शिक्षक मो.अनवर मो.हुसैन, अब्दुल अजीज, गजानन ढवळे, शेख रहेमान. मोहम्‍मद हबीब, सुशीला सोनोने, युवराज पठाडे, सरदार खान, गजानन काकड, अमलमेरी पिल्ले, मो.अनिस. गजानन मानकर, मयुर पवार, संदिप राठोड, मनोज बोचरे, अर्जुन हिंगमीरे, भुतकर, अशोक बुलबुले, समग्र शिक्षा अभियानातील सर्व सुलभक इत्यादीनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्‍यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!