Double Murder अकोला शहरात रक्तरंजित पहाट; वडिलांनी केली ९ वर्षीय मुलीची व पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २४ एप्रिल :- Double Murder सलग दोन मर्डर झाल्याची घटना अकोलेकरांच्या डोक्यातून निघून जात नाही तोच आज परत त्याच्या पोलीस स्टेशन हद्दीत डबल मर्डर झाल्याने आज बुधवारची सकाळ ही रक्तरंजित सकाळ ठरली जनमदात्या बापाने आपली बायको आणि मुलीची हत्या केल्याने परिसरात हळहळ तर शहरात खळबळ उडाली आहे.

रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिरा जवळ राहणाऱ्या म्हात्रे परिवारात आज हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली याच परिवारात उद्याचे लग्न Double Murder असल्याने घरात पाहुणे आले होते लग्नाच्या लगभगित हा रक्त रंजीत प्रकार घडल्याने घरात दुःखाचे सावट पसरले

Double Murder असा घडला प्रकार

संतोषी माता मंदिराला लागून असलेल्या घरान मधील एका घरात म्हात्रे परिवार राहत होता याच परिवारात मनीष म्हात्रे वय अंदाजे ३९ हा आपली बायको लक्षी वय वर्ष ३० व ९ वर्षीय मुलगी माही असा हा परिवार होता मात्र मनीष याला दारूचे व्यसान असल्याने घरात सतत वादविवाद सुरू राहायचे याच त्रासाला कंटाळून पाच वर्षा पूर्वी पत्नी लक्ष्मी ही आपल्या मुलीला घेवून नांदेड येथे आपल्या माहेरी राहायला गेली होती तर मुलीला शिक्षणासाठी मुंबई येथे आपल्या नातलगांकडे पाठवले होते मात्र २५ एप्रिल रोजी घरी लग्न असल्याने लक्ष्मी व माही हिला देखील बोलवण्यात आले होते.

घरात लग्नाची कामे आटपून थकून भागून सगळे झोपी गेले मात्र रात्री परत मनीष आणि लक्ष्मी यांच्यात वाद उफाळून आला पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि मनीष म्हात्रे याने कुऱ्हाडीने वार करून पाहिले Double Murder नऊ वर्षीय मुलीवर वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलीला पाहून तिची आई लक्ष्मी ओरडणार तोच मनीष ने क्षणाचा विलंब न करता त्याची पत्नी लक्ष्मी हिच्यावर वर पण वार करण्यास सुरुवात केली या घटनेत दोघा मयलेकिंचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Double Murder घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आरोपीला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी तसेच तसे तज्ञ पोहोचले होते. घडलेल्या या घटनेमध्ये पोलिसांनी आरोपी मनीष मात्रे यास अटक जरी केली असेल तरी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ तर शहरात खळबळ उडाली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!