WhatsApp

Death by drowning in the river वारी भैरवगड येथील डोहात सस्ती वाडेगाव येथील तरूणाचा बूडून अंत आड नदी पात्रातील राजण्या डोहातील धटना

दानापुर (वा) अकोला – Death by drowning in the river बुलढाणा जिल्ह्याच्या सिमारेषेवरील वारी भैरवगड येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळावरील हनूमान मंदीरालगत अरनदी पात्रातील राजण्या डोहात एका तरूणाचा बूडून अंत झाला आहे. हि दुदैवी धटना सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत शूक्रवारी दूपारी धडली. डोहात बूडून मरण पावलेल्या तरूणाचे नाव आदित्य जयंत मेहरे वय २१ वर्षाचा आहे. सदर तरूण अकोला जिल्ह्यातील सस्ती वाडेगाव येथील आहे.

माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्यातील मोईनोद्दीन सैय्यद, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दूपारपासून डोहात बुडालेल्या तरूणाला शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली आहे. सायंकाळी तरूणाचा मुतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

अकोला, बुलढाणा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे पुरातन हनुमान मंदिर आहे. हनुमानच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भावीकांची रेलचेल असते. सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य वातावरण तसेच तीन नद्यांचे संगम असल्याने या जागेला अधिकचे महत्त्व प्राप्त झाले. वान नदी व अर नदी पात्रातील डोह हे मृत्यूचे सापळे बनल्याने या डोहांमध्ये बूडून मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान सायंकाळी तरूणाच्या मुतदेहाला शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

डोह बनताहेत मृत्यूचे सापळे

अकोला-बुलढाणा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे पुरातन हनुमान मंदिर आहे. हनुमानच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची रेलचेल असते. सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य वातावरण तसेच तीन नद्यांचे संगम असल्याने या जागेला अधिकचे महत्त्व प्राप्त झाले. वान नदी व अर नदी पात्रातील डोह हे मृत्यूचे सापळे बनल्याने या डोहांमध्ये बुडून मृत्यू संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!