WhatsApp

Crime News स्पर्धा परीक्षेच्या नावावर ठाणेदाराने केला युवतीचा विनयभंग, अकोल्याच्या ठाणेदारावर नागपूर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १९ मे :- Crime News अकोला पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्याने पोलिसांवर विश्वास ठेवावा तरी कसा ? असे प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेचे संरक्षण करणारे पोलीसच आता जीवावर उठेले की काय ? अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनात घर करू लागली आहे.

सर्वच अधिकारी, कर्मचारी सारखे नसतात, असे असले तरी सामान्य अकोलेकराना आता पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची भीती वाटू लागल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहेत. पोलीसच आपल्या कायद्याचा गैर फायदा घेणारी आणखी एक घटना घडली घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील खदान पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपूर येथील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचा Crime News विनयभंग केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथे स्पर्धा परीक्षे करीता शिकत असणाऱ्या अमरावती येथील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर युवतीने केला आहे.

नेमकं काय घडलं? Crime News

अमरावती येथील रहिवासी पीडिता विद्यार्थिनी ही नागपूर येथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करत आहे. याच दरम्यान सदर युवतीची ओळख अकोला पोलीस दलात कार्यरत पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्याशी झाली. त्यानंतर धनंजय सायरे यांनी मी तुला अभ्यासा साठी मदत करून तुला चागलं मार्क कसे मिळवता येतील त्या साठी मार्गदर्शन करतो, असे सांगितले.

पीडित मुळेचे वडील देखील पोलीस खात्यात हवालदार असल्याने या युवतीने सदर बाब आपल्या आई वडिलांना सांगितली या कृत्याबाबत कोणतीही पुसटशी कल्पना नसलेल्या युवतीच्या आई वडिलांना आपल्या मुलीला पोलीस अधिकारी मदत करणार असल्याने त्यांना देखील आनंद झाला मात्र त्या नंतर घडले. ते काही विपरीतच होते.

काय आहे नेमका आरोप Crime News

शुक्रवारी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे ह्यांनी नागपूर गाठून पीडित युवतीला भेटण्यास बोलावले असता ही युवती आपले मार्गदर्शक असलेले धनंजय सायरे यांना हॉटेलमध्ये भेटण्यास गेली आधी धनंजय सायरे ह्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्या नंतर धनंजय सायरे ह्यांनी या युवतीचा हात पकडुन तिला हॉटेलमध्ये येण्यास जबरदस्ती केली असल्याचा आरोप सदर पीडितेने लावला आहे.

घाबरलेल्या युवतीने आपली सुटका करत आपल्या रूम वर पोहचून घडलेली संपूर्ण घटना आपल्या घरच्यांना सांगितली. त्या नंतर नागपूर नंदनवन पोलीस स्टेशन येथे युवतीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ३५४ विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

अकोला पोलिसांची प्रतिमा मलिन Crime News

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडीवरून अकोला पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे. अकोट येथे आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका डॉक्टरच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला चार तास पोलीस ठाण्यात थांबवण्यात आल्याचा प्रकार घडला.

त्यानंतर चान्नी पोलिसानेच तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता त्या नंतर आता पोलीस निरीक्षका वर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्याने नेमकी दाद मागावी तरी कुणाला असा प्रश्न जनते समोर उभा ठाकला असून आता पोलीस निरीक्षक बच्चन सिंग या वर काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 thoughts on “Crime News स्पर्धा परीक्षेच्या नावावर ठाणेदाराने केला युवतीचा विनयभंग, अकोल्याच्या ठाणेदारावर नागपूर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल”

  1. श्री बच्चन सिह यांना पोलीस निरीक्षक लिहून IPS पदाची अवहेलना केली आहे ही बाब योग्य नाही . लिहतांना काळजी घायवी.

    Reply
  2. श्री बच्चन सिह यांना पोलीस निरीक्षक लिहून IPS पदाची अवहेलना केली आहे ही बाब योग्य नाही . लिहतांना काळजी घायवी.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!