WhatsApp

CBSE Result 2024: CBSE बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा Result कधी लागणार? जाणून घ्या निकालाची Latest Update

CBSE Class 10th And 12th Result 2024 Date: CBSE बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा काही दिवसांपूर्वी संपल्या होत्या. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. 10 वीची परीक्षा ही 13 मार्च रोजी तर 12 वीची परीक्षा ही 2 एप्रिल 2024 रोजी संपली होती (CBSE Board 10th And 12th Result 2024).

सध्या या उत्तरपत्रिका तापासण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती तसेच मिडीया रिपोर्ट्सनुसार, दरवर्षीप्रमाणे या वेळीही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या दहावी आणि बारावी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सचे निकाल लवकरच जाहीर केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in वर उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख याद्वारे त्या वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.

2023 – 2024 शैक्षणिक वर्षाची सीबीएसई बोर्डाची 12 वीची परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. तर 10 वीची परीक्षा मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी यावेळी 26 देशांतील 39 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

CBSE Board 10th 12th Result 2024 Date: CBSE 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी जाहीर होईल?

गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सीबीएसई बोर्डाचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला. मात्र, यावेळी निकालाला उशीर होणार नाही. एप्रिलअखेर निकाल जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सीबीएसई बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

CBSE Board Result: पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता?

CBSE बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 33 टक्के गुण आवश्यक आहेत. जर तुमचे गुण दोन पेक्षा जास्त विषयात 33 पेक्षा कमी असतील तर विद्यार्थी नापास समजला जाईल.

CBSE Board 10th And 12th Result 2024 Link: निकाल पाहण्यासाठी लिंक

cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.cbse.nic.in

CBSE Class 10th and 12th exam results, conducted on March 13th and April 2nd, 2024 respectively, will be announced in late April. Official information regarding the exact date has not been provided by the CBSE Board. To pass the CBSE Board exams, students must obtain a minimum of 33% marks in each subject, failing which they will be considered as not qualified. Here are the links to check the CBSE 10th and 12th results: cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in.

Leave a Comment

error: Content is protected !!