Bogus Seeds अकोल्यात बोगस बियाणे विक्रीवर कडक कारवाई, ७५ हजारचे बोगस बियाने जप्त भरारी पथकाने केले गुन्हे दाखल

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३० मे २०२४ :- Bogus Seeds अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीच्या प्रकरणांना लगाम घालण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार बोगस बियाणे विक्रीतील कुठल्याही गैरप्रकारांवर तत्काळ कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Bogus Seeds अकोल्यात बोगस बियाणे विक्रीवर कडक कारवाई, ७५ हजारचे बोगस बियाने जप्त भरारी पथकाने केले गुन्हे दाखल
Bogus Seeds

गेल्या आठवड्यात भरारी पथकांनी अकोट तालुक्यातील उमरा येथे छापा टाकून 75 हजार रुपयांची Bogus Seeds बोगस कापूस बियाणे जप्त केली. याबाबत निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर) यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील अश्विनी ॲग्रो एजन्सीच्या प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्याविरुद्धही तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bogus Seeds अकोल्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बोगस बियाणे विक्रीवर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यासाठी विशेष भरारी पथके स्थापन केली असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे आणि कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

भरारी पथकातील मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनी गावोगावी भेटी देऊन फसवणुकीची Bogus Seeds बाब रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भरारी पथक सतर्क आहे आणि कुठेही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना योग्य बियाणे मिळाव्यात आणि ते फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी कृषी विभाग पूर्ण जागरूक आहे. बियाणे विक्रेत्यांनीही शेतकरी हितावर लक्ष केंद्रित करावे आणि गुणवत्तापूर्ण बियाणे पुरवाव्यात, अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल, असा इशारा दिला जात आहे. Bogus Seeds

Bogus Seeds
Bogus Seeds

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीत सावधगिरी बाळगावी आणि कुठल्याही गैरप्रकारांची माहिती तात्काळ कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बोगस बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. Bogus Seeds

Leave a Comment

error: Content is protected !!