अकोला न्युज नेटवर्क स्वप्नील सुवाडे प्रतिनिधी पातूर दी. २७ नोव्हेंबर :- Bag stolen from Luxury bus जिल्ह्यातील पातूर येथे एका ढाब्यावर लक्झरी गाड्या प्रवाश्यांना जेवण घेण्यासाठी थांबतात त्या नूसार अमरावती येथून निघालेली एक लक्झरी बस थांबली होती. त्यामुळें प्रवाशी जेवणासाठी उतरले आणि जेवण्याचा ऑर्डर दिली सुध्दा मात्र याचवेळी राजू चोलारामन हे अमरावतीहून पुण्याला खासगी बसमध्ये चढले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ 81 लाख रुपयांची रोकड भरलेली बॅग होती. पातूर येथे बस थांबल्यावर तो बसमधून थोडा वेळ खाली उतरला, काहीं वेळातच तो आपल्या सीटवर पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले कारण अज्ञात आरोपीने त्याच्याजवळील रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेली. Bag stolen from Luxury bus या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना तक्रारदार एवढा बेफिकीर कसा काय? रक्कम गायब झाली की आणखी काही प्रकरण आहे?, अशी चर्चा आहे. पोलीस तपासात अनेक प्रश्न समोर येणार आहेत. राजू चोलारामन या प्रवाशाने पातूर पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली . फिर्यादीनुसार पातूर पोलिसांनी भा द वी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र ८१लाख रूपये एवढी मोठी रक्कम सोबत घेऊन सार्वजनिक प्रवाशी वाहनाने प्रवास केला जातो. आणि प्रवासात ती बॅग गाडीत सोडुन जेवणाला ढाब्यावर उतरतो. त्यातच ती बॅग गायब होते त्यामुळे एवढी मोठी रक्कम कुणाची? लक्झरी मधून प्रवास? खाजगी गाडी का वापरली नाही? असे विविध प्रश्न उपस्थित करीत चर्चांना उधाण आले आहे. पोलिस तपासात या प्रश्नाची उत्तरे मिळतील मात्र सध्यातरी तर्क वितर्क लढवले जात आहेत.