WhatsApp

Bacchu Kadu अमरावतीत सायन्स मैदानाच्या परवानगीवरून पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात वाद…

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २३ एप्रिल :- Bacchu Kadu अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमेदवार देण्यात आला आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने अमरावती मधील सभेचे मैदान बुक करण्यात आले होते. मात्र, त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी मैदानावरच ठिय्या आंदोलन केले आहे. अखेर पोलिसांनीच आता भाजपचे गमचे गळ्यात घेऊन यावे आणि पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

अमरावती येथील सायन्स स्कोर मैदान बच्चू कडू Bacchu Kadu यांनी 24 तारखेला सभेसाठी बुक केले होते. इतकेच नाहीतर त्याचे पैसे देखील भरले होते. मात्र, आता या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असून आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहा यांची सभा कशी होईल, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे असताना देखील पोलिस अधिकारी आम्हाला सभेला परवानगी देत नाही. तर अमित शहा यांच्या सभेला परवानगी कशी मिळते? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांची बच्चू कडू यांना विनंती Bacchu Kadu

आमदार बच्चू कडू यांनी लायन्स स्कोर मैदानावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगली धावपळ झाली. आपण लोकप्रतिनिधी आहात, केंद्रीय गृहमंत्री यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हे मैदान देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांच्या या दाव्याला बच्चू कडू यांनी थेट विरोध केला आहे. आमच्याकडे परवानगी असताना आमची सभा रद्द का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

गृहमंत्री जर आचारसंहितेचा भंग करत असतील तर काय?

आम्ही पाच तारखेला मैदानासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 18 तारखेला पैसे देखील भरले आहेत. असे असताना देखील आता परवानगी मान्य करायला पोलिस प्रशासन तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री येत असल्यामुळे आम्हाला परवानगी नाकारली जात असल्याचे बच्चू कडू Bacchu Kadu यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचे काम अमरावती पोलिस करत आहे. गृहमंत्री जर आचारसंहितेचा भंग करत असतील तर काय? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आता 26 तारखेपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

उद्या एक लाख कार्यकर्ते दाखल होतील

निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्याचा काही फायदा होणार नसल्याचेही बच्चू कडू Bacchu Kadu यांनी म्हटले आहे. कायदाच शिल्लक नाही, त्यामुळे तक्रार करून काही उपयोग नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तरी देखील आम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली. उद्या एक लाख कार्यकर्ते या मैदानावर जमा होणार असून सभा झाली नाही तर येथेच एक लाख कार्यकर्ते 26 तारखेपर्यंत ठिय्या देतील, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!