WhatsApp


Angelo Mathews Timed Out: अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइम आऊट होणारा ठरला पहिला फलंदाज, जाणून घ्या नियम

Angelo Mathews Timed Out 25 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यावर ही घटना सुरू झाली. यानंतर गोलंदाजी करणाऱ्या शकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध वेळ मारून नेण्याचे आवाहन केले.

क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या खेळाडूला टाइम आऊट देणे ही पहिलीच वेळ आहे.श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता आऊट देण्यात आला. Angelo Mathews Timed Out एखाद्या खेळाडूला अशाप्रकारे पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. नियम असा आहे की फलंदाज बाद झाल्यानंतर 3 मिनिटांच्या आत क्रीजवर असणे आवश्यक आहे. 25 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यावर ही घटना सुरू झाली.

यानंतर गोलंदाजी करणाऱ्या शकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध वेळ मारून नेण्याचे आवाहन केले. वास्तविक, मॅथ्यूजने सुरुवातीला चुकीचे हेल्मेट आणले होते, त्यानंतर त्याने हेल्मेट बदलण्यास सांगितले. यावर साकिबने अपिल केले. यावर फील्ड अंपायर माराईस इरास्मस यांनी शाकिबला वारंवार विचारले, तू खरोखरच अपील आहेस का? बांगलादेशचा कर्णधार म्हणाला, होय आम्ही आवाहन करत आहोत. यानंतर इरास्मसने मॅथ्यूजला आऊट देण्यात आले.

नेमकं काय घडलं? Angelo Mathews Timed Out
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात २४व्या ओव्हरमध्ये समरविक्रमा बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. पण बॅटिंगला सुरुवात करणार तेवढ्यात त्याला त्याच्या हेलमेटमध्ये काहीतरी समस्या जाणवली. त्यानं तातडीने पॅव्हेलियनमध्ये दुसरं हेलमेट मागवलं. हेलमेट आलंही. पण ते घालून मॅथ्यूज पुन्हा बॅटिंग करण्याआधीच शाकिब अल हसननं अम्पायरकडे आऊटचं अपील केलं होतं आणि अम्पायरनंही मॅथ्यूजला आऊट दिलं होतं! हे पाहून सगळेच चक्रावले होते. पण तिकडे बांगलादेशचे खेळाडू आणि विशेषत: शाकिब अल हसन मात्र खुश होते. कारण श्रीलंकेचा धडाकेबाज खेळाडू एकही चेंडू न खेळता अगदी स्वस्तात माघारी परतला होता.

हे घडलं कसं? Angelo Mathews Timed Out
हे सगळं घडलं ते क्रिकेटच्या एका नियमामुळे. एमसीसी अर्थात मेलबर्न क्रिकेट क्लबकडून क्रिकेटची नियमावली तया केली जाते. आपण क्रिकेटमध्ये सध्या पाहात असलेले वाईड बॉल, विकेट, एलबीडब्ल्यू असे क्रिकेटशी संबंधित सर्व नियम एमसीसीच तयार करत असते. लंडनच्या लॉर्ड्समध्ये एमसीसीचं कार्यालय आहे. दर काही वर्षांनी एमसीसी या नियमावलीत भर घालत असते किंवा जुने कालबाह्य ठरलेले नियम रद्द करत असते. एमसीसीच्या नियमावलीची तिसरी प्रत १ ऑक्टोबर २०२२ पासून अंमलात आली असून त्यातील ४०.१ क्रमांकाच्या नियमानुसार अम्पायरनं अँजेलो मॅथ्यूजला बाद दिलं.

काय आहे Time Out चा नियम? Angelo Mathews Timed Out
एमसीसीच्या नियमावलीनुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर गेल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत पुढच्या फलंदाजाने मैदानात थेट क्रीजवर येऊन फलंदाजी करण्यासाठी तयार राहायला हवं. जर यादरम्यान अतिरिक्त वेळेची मागणी अम्पायरच्या परवानगीने किंवा संमतीने करण्यात आली असेल, तर ते विचारात घेतलं जातं. मात्र, तसं नसल्यास तीन मिनिटांच्या आत फलंदाज सर्व तयारी करून चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर उपस्थित असायला हवा.

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. अकोला न्युजच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून अकोला न्युजची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व अकोला न्युज स्वीकारत नाही.)

Leave a Comment

error: Content is protected !!