WhatsApp

Akot Bear attack : सातपुड्यातील पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांवर अस्वलांचा हल्ला, हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू!

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो आकाश तायडे प्रतिनिधी पोपटखेड दि. ११ मार्च २०२४ :- सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर रुपागड जंगल परिसरात एक आज सकाळी सात वाजताच दरम्यान दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सकाळी सात वाजताचच्या दरम्यान जितापूर वनखंड १०७७ मधील गस्त आटपून परत येणाऱ्या वनरक्षक सोगे व दोन वनमजुरांच्या पथकावर अचानक अस्वलांच्या कळपाने हल्ला केला.

कळपात चार ते पाच अस्वल होते. यातील एका वयोवृद्ध वनमजुरावर त्यांनी हल्ला केला. इतर सहकारी आरडाओरड करूनही अस्वलांची संख्या जास्त असल्याने ते परतले नाहीत. नंतर अस्वलांनी शहापूर येथील ५० वर्षीय वनपाल रसूल रुस्तम मोरे यांच्यावरही हल्ला केला.

सोबत असलेले वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी कसे बसे मोरे यांना त्या अस्वलाच्या तावडीतून सोडवले पण या अस्वलाच्या हल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले असल्याने कॉस्टेबल सहकारी यांनी त्वरित त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद असून वनविभागातील सर्वांना धक्का बसला आहे.

वनपाल रसूल मोरे यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय हळहळले आहेत. या घटनेचा गंभीर दखल घेत वनविभागाने परिसरात अस्वलांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. जंगलातून वाटचाल करतानाही अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!