Akola Z P Corruption जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार; ग्रामस्थांकडून वरिष्ठांकडे तक्रार

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ५ एप्रिल :- Akola Z P Corruption अकोला जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या आवरभिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी सविस्तर तपास करण्याची मागणी करत, संबंधित अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी निवेदन दाखल केले आहे.

गांधीग्रामच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवरभिंतीच्या बांधकामात कच्च्या विटांचा वापर, कमी प्रमाणात सिमेंट वापरणे आणि पाणीपुरवठा न करणे अशा गैरप्रकारांची नोंद ग्रामस्थांनी केली आहे. या बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन काही काळासाठी काम बंद केले होते. Akola Z P Corruption

आवरभिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे. या काळात सरपंचपती शरद ठाकरे यांनी गर्द करून काम सुरू केले, मात्र त्यानंतरही कामाची गुणवत्ता सुधारली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. असून या बाबत व्हिडीओ देखील दिला असून तुम्ही स्वतः देखील या कामा करीता वापरण्यात येणाऱ्या बांधकामाच्या विटांची गुवत्ता तपासू शकता

Akola Z P Corruption

Akola Z P Corruption ग्रामस्थांना असे आढळून आले की, या कामात ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्यात मिलीभगत असल्याचे. ठेकेदाराचा हेकेखोरपणा व ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा यामुळे बांधकाम दर्जाहीन झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या गैरप्रकारांविषयी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विस्तार अधिकारी पंचायत समिती अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला आणि जिल्हाधिकारी अकोला यांना ग्रामस्थांनी निवेदन पाठवले आहे.

या निवेदनावर ग्रामस्थांनी गांधीग्रामच्या सुमारे १५ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यात संजय माजरे, आनंद अढाऊ, मनीष ढोरे, प्रकाश काठोळे, सुधीर ढोरे, प्रशांत फुरसुले, अतुल काठोळे, संतोष अढाऊ, भूषण काठोळे, राहील शेख, कैलास सदांशिव, चेतन सदांशिव, सौरव माजरे यांचा समावेश आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी ते करीत आहेत. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या आवरभिंतीच्या बांधकामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या कामात ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्यातील सूडबुद्धीमुळे बांधकामाचा दर्जा खालावल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

ग्रामविकास विभागाच्या या कामात केलेल्या गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी व्हावी, असी ग्रामस्थांची मागणी आहे. या कारवाईत कसूर केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गांधीग्रामच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवरभिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!