Akola Road Accident विचित्र अपघातात पिकअप लटकला डिव्हयडर वर तीन जन गंभीर जखमी

Akola Road Accident अकोला शहरा बाहेरील रस्ते अगदी सुसाट झाले मात्र आता हेच रस्ते जीवघेणे ठरत असून दररोज अपघातचे सत्र सुरूच असून या अपघातात काही जणांना आपला जीव गमवावा लागतो तर काही जणांना कायमचे अपंगत्व येत असाच एक विचित्र अपघात आज सकाळच्या सुमारास अकोला शहरा जवळील बाबुळगाव मार्गांवर घडला या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले.

akola news wahatsapp
akola news wahatsapp

आज ७ जानेवारीला सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग, शिवानी बाभूळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालया जवळ च्या पुलावरील अनियंत्रित पोल्ट्री फार्मवरून कोंबड्यांनी भरलेली चारचाकी (महिंद्रा पिकअप) चा अपघात झाला या विचित्र अपघातात महिंद्रा पिकअप हे चारचाकी वाहन दोन डिव्हायडरवर चढून मधेच लटकला ज्यामध्ये लटकलेल्या वाहनात चालक आणि दोन जण अडकले होते. या चारचाकी वाहणात अडकलेल्याना बऱ्याच प्रयत्नानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना मदतीने बाहेर काढून अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. नंतर क्रेनच्या साहाय्याने ही दुभाजकावर लटकलेली गाडी काढण्यात आली या अपघातात चालक फैजची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून शेख तनवीर आणि ओवेस खान ह्यांना देखील अकोला दुखावत झाली आहे. या अपघातात जखमी झालेले तिघेही वडेगाव येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!