WhatsApp


Akola politics अकोला राजकारणात भूकंपाचा सौम्य धक्का; ऊबाठा शिवसेनेत शिवा मोहोडांचा प्रवेश

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २२ एप्रिल :- Akola politics अकोला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरणात एक मोठा बदल घडला असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे अजित पवार गटातील शिवा मोहोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी अकोला जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवणारी ठरणार आहे.

राज्यात शरदपवार आणि अजित पवार गटांमध्ये राष्ट्रवादी विभागल्यानंतर, जिल्हा पातळीवरही गटबाजी सुरू झाली होती. अजित पवार गटातील मोहोड Akola politics हे प्रमुख नेते होते. मात्र त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याच गटातील आमदार मिटकरी यांनी संताप व्यक्त केला होता आणि त्यांनी राजीनाम्याचा इशाराही दिला होता.

Akola politics
Akola politics

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून फक्त ७२ तास शिल्लक राहिले असताना शिवा मोहोड यांनी उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी पुढे आली आहे. Akola politics मोहोड यांनी बुलढाणा येथे नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारा साठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उद्धव ठाकरे आले असता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Akola politics ही घटना अकोला जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडवून आणणारी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच असा मोठा धक्का मिळाल्याने अजित पवार गटाला फटका बसणार आहे. याचा परिणाम मतदानावरही पडू शकतो. उलट शिवसेनेला या निर्णयामुळे बळ मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही निमित्त येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका बदलणारी कृती राजकीय वातावरणात अनिश्चिततेची भावना Akola politics निर्माण करीत असली तरी मोहोड यांच्या या निर्णयामुळे मतदानाचे समीकरण कसे बदलेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!