WhatsApp


Akola News ग्रामसेवकाने घनकचरा खाल्ला ? लाखोंच्या अपहार प्रकरणी निलंबनाची मागणी

ANN & GTPL न्यूज नेटवर्क, अकोला दि. 25 जून 2024 स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर : Akola News संपूर्ण जिल्हाभरात सर्वात क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या व भ्रष्टाचार असो की चारसो-बीसी अशा अनेक कारणांमुळे सदानकदा चर्चेत असणारी पातूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाच्या प्रतापाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

पातूर तालुक्यातील ग्राम पंचायत तुलंगा येथील सचिवाने घनकचरा व्यवस्थापनच्या कामात लाखो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी सदर ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी करण्यासंबंधित Akola News तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत तुलंगा येथील घनकचरा व्यवस्थापनची कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.त्यानंतर काम पूर्ण झाल्यामुळे सदर कामाचे देयक हे संबंधित कंत्राटदाराला Akola News देणे असतांना तुलंगा ग्रामपंचायत चे सचिव स्नेहल साखरचंद गवई यांनी ज्यांनी काम केले त्या कंत्राटदाराला वगळून आपल्या पदाचा गैरवापर करून जवळच्या व्यक्तीच्या खात्यात १,३८,००० रुपये वळते करून अपहार केला, व संबंधित कंत्राटदार व शासनाची दिशाभूल केली.

सचिव स्नेहल साखरचंद गवई यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून आपल्या स्तरावर चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी तक्रार मनोज गवई रा.दिग्रस व विजय हातोले रा.तुलंगा यांनी गटविकास अधिकारी Akola News पं. स.पातूर यांना दिली असून सदर प्रकरणी योग्य कारवाई नं झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.पातूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील वृक्ष लागवडीमधील भ्रष्टाचाराची चौकशी लागलेली असून सदर प्रकरण अजून पूर्णत्वास आले नाही तोच पुन्हा घनकचऱ्याच्या कामाचा अपहार समोर आल्याने पातूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचे धडे गिरवल्या जातात काय असा प्रश्न उपस्थित होतो.याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन यास आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!