WhatsApp

Akola News अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या इंजन समोर उडी घेवून अज्ञात इस्माची आत्महत्या

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १२ जून २०२४ :- Akola News अकोला रेल्वे स्थानकावर आज सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान शालिमार एक्सप्रेस या गाडीच्या समोर अज्ञात व्यक्तीने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म वर एकच खळबळ उडाली.

Akola News उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच संपणार असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची खचाखच गर्दी पाहायला मिळते आज देखील अकोला रेल्वे स्थानक प्लॉट फॉर्म नंबर १ वर प्रवाशांनी गर्दी केली होती सायंकाळी सात वाजता येणारी शालिमार एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर पोहोचणार तोच एका अज्ञात इसमाने कुर्ला एक्सप्रेस च्या इंजन समोर उडी घेवून आत्महत्या केली.

सदर प्रकार क्षणात घडल्याने येथे उपस्थित प्रवाशना Akola News या इसमास वाचवण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही येथे उपस्थित प्रवासी या इसमाला वाचवायला जा आधीच रेल्वे त्याच्या अंगावरून गेली आणि या इसमाचा मृत्यू झाला.

Akola News सदर घटनेची माहिती मिळताच अकोला रेल्वे पोलीस तसेच जिरापी पोलीस घटनास्थळी पोहचले असून नेमका हा इसम कोण ? याने आत्महत्या का केली? मृतक नेमका कुठे राहणार आहे? या व इतर बाबींचा तपास करण्यात गुंतले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!