अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २९ मार्च गणेश बुटे प्रतिनिधी चोहट्ट बाजार :- Akola News अकोट तालुक्यातील बोर्डी गावचा शेतमजूर जगन्नाथ किसन सोनोने (७०) याची हकीकत फारच हृदयद्रावक आहे. घरची परिस्थिती गरिबीची, जगन्नाथ किसन सोनोने वय ७० व्यवसाय शेतमजूर पत्नी, एक मुलगा,नातवंडं आणि कुटुंबाचा गाडा हाकताना जगणे असह्य व्हायचे. पण तरीही चांगले दिवस येतील या आशेवर जगन्नाथ सोनोने कुटुंबासाठी खस्ता खात होते. काही दिवस आधी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर होऊन पहिला टप्प्याचे निधी मिळाल्याने जुने घराचे भिंत पाडण्याचे काम सुरू केले मात्र,भिंत पाडण्याचे काम करीत असताना भिंत अंगावर पडुन अपघाती मृत्यूमुळे त्याच्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला. नव्या घराचे आणि कुटुंबीयांना चांगले दिवस दाखविण्याचे त्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.
प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरकुल मंजूर झाले. मिळालेल्या निधीतून जुन्या घराच्या भिंती पाडून नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात केली. पण काय साधार ज्याची पायरी पुढे टाकायची तीच पायरी बनली शेवटची. घराच्या भिंतीच्या पडण्यात अडकून ते गंभीर जखमी झाले. अकोला येथील रुग्णालयात हलविण्याआधीच अर्धवट रस्त्यावरून जाताना त्यांचा मृत्यू झाला.
जगन्नाथ गरिबीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होते. नव्या घराची स्वप्ने पाहत होते. पण त्यांच्या स्वप्नांवरच जीवनाची मुहूर्तमेढ पडली. कष्टाने मिळवलेली थोडीफार कमाई अशा प्रकारे संपली. आता त्यांच्या कुटुंबावर कसे दिवस येतील याची काळजी वाटते.
शासकीय योजनांतून सुद्धा गरिबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्यांनी स्वतःच्या खंबीरपणाने हातावर घेतलेली झीज होती तिथेही त्यांना कटू अनुभव घ्यावा लागला. त्यांच्या मृत्युने गरिबीतून बाहेर पडण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. अशा लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मदत झाली पाहिजे.
अर्धवट रस्त्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशा रस्त्यांना लवकरात लवकर पूर्ण करून सुरक्षिततेची हमी द्यायला हवी. नाहीतर आणखी बरेच जगन्नाथ आपल्या स्वप्नांप्रमाणेच मरण पावतील याची शाश्वती कोणाला देता येईल?
अकोट अकोला मार्ग आणखी किती जीव घेणार..
अकोट अकोला महामार्ग चे बांधकाम गेल्या ९ वर्ष पासून कासव गतीने सुरू आहे. अर्धवट रस्त्याचे बांधकामामुळे अकोट वरून रुग्ण पुढील उपचार घेण्यासाठी जिल्याचे ठिकाणी हलविताना मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही त्यामुळे कित्तेक रुग्णांना खराब रस्त्यामुळे आपले जीव गमावावे लागले.संत गतीने चालू असणारे महामार्ग काम आणखी किती जणांचे प्राण घेण्याचे प्रतीक्षेत आहे.