Akola News | गुन्हे अन्वेषण विभागा पुणे यांनी जाहीर केलेल्या माहे जूलै २०२३ ची सिसिटीएनएस रॅकींग मध्ये अकोला जिल्हयाने राज्यात ४६ घटकांपैकी ७ वा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे.
अकोला जिल्हा पोलीस दलाची सीसीटीएनएस प्रणालीतील कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान, नुकत्याच जुलै २०२३ च्या लागलेल्या सीसीटीएनएस रॅकिंगमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने राज्यात ७ वे स्थान पटकावले आहे. त्यामुळे राज्यात अकोला जिल्ह्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.
पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीबाबतचा आढावा दर महिन्यात घेण्यात येतो. राज्यातील सर्व घटकांचे जुन महिन्यामधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन दिलेल्या गुणांकनानुसार अकोला जिल्ह्याने राज्यात सातवा क्रमांक पटकावला.
पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (क्राईम क्रीमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे यात अभीलेख्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. सीसीटीएनएस प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहीती यामध्ये उपलब्ध होते त्यामध्ये ई-तकार, अनोळखी मृतदेह शोधने, गुन्हे प्रतिबंध कारवाई, वाहनांची पडताळणी करणे, गुन्हे उघडकीस आण आदी करीता ही प्रणाली महत्वाची ठरते. सीसीटीएनएस मध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयांपासून ते तपास व दोषारोपपत्र इत्यादी १८ प्रकारची माहीती उपलोड करावी लागते.
उपरोक्त माहीतीचा प्रत्येक महीण्याला गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचेकडून आढावा घेतला जातो, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पो. महासंचालक प्रशांत बुरडे यांनी माहे जुलै २०२३ महीण्याचा अहवाल जाहीर केला असता त्यामध्ये एकुन ४६ घटकांपैकी अकोला पोलीस दलाने २०१ पैकी १७४ गुण (८७%) प्राप्त करून राज्यात ०७ वा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्र, अमरावती विभागातुन प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.
पोलीस अधीक्षक, संदिप घुगे, नोडल अधीकारी तथा अपर पो. अधीक्षक अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. उपनिरीक्षक प्रशांत पाटील नापोका सतिश भातखडे, पोकॉ शुभम सुरवाडे यांनी यासाठी परीश्रम घेतले तसेच पोलीस स्टेशन व उपविभागीय स्तरावरील सीसीटीएनएस अंमलदारांचेही यामध्ये महत्वाचे योगदान आहे.
सीसीटीएनएस प्रणाली म्हणजे काय?
सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये पोलिस ठाण्यामध्ये दाखल होणारी प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेल्या व्यक्ती, अनोळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ किंवा बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व इतर नोंदी अशा एकुण १८ प्रकारच्या माहितीची वेळेत परिपूर्ण नोंदी कराव्या लागतात.
तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनंदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकीस आणून कामगिरी करावी लागते. या बरोबरच सिटीझन पोर्टलवरील इ – तक्रारींची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर करावा लागतो. त्यानुसार मग दर महिन्याला गुण मिळवून मानांकन ठरवले जाते.
सीसीटीएनएस प्रणालीचा दैनंदिन कामकाजात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुहिक प्रयत्न केले त्यामुळे परिपूर्ण नोंदी झाल्या तसेच गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकीस आणून चांगली कामगिरी करण्यात आली. सिटीझन पोर्टलवरील ई- तक्रारींची देखील वेळेत नोंद आणि प्रभावी वापर झाला. त्यामुळे यश मिळाले असून भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.