WhatsApp

Akola Lok Sabha Elections 2024 काँग्रेसची अकोला उमेदवारी जाहीर? डॉ. पाटलांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत टक्कर तिव्र

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २१ मार्च :- Akola Lok Sabha Elections 2024 काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दिल्लीतील बैठकीत अकोला मतदारसंघासाठी डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. डॉ. पाटील यांच्या घोषित उमेदवारीमुळे अकोल्यासाठीची निवडणूक रंगणार असून इतर पक्षांना टक्कर द्यावी लागणार आहे.

डॉ. अभय पाटील हे अकोल्यातील ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन असून गेली ३० वर्षे त्यांनी येथे प्रॅक्टिस केली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि अकोला हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

डॉ. पाटलांच्या उमेदवारीमुळे Akola Lok Sabha Elections 2024 वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीत सामील होण्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अकोल्यासाठी आंबेडकरांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, काँग्रेसच्या निर्णयामुळे आता त्यांच्यासमोर पर्यायांचा अभाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, अनेक सामाजिक कार्यक्रमांमुळे डॉ. पाटलांचा जनसंपर्क अकोल्यात चांगला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होणे अपेक्षित होतेच. यासर्व घडामोडींमुळे अकोल्या मतदारसंघात निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इतर पक्षांनाही डॉ. पाटलांच्या उमेदवारीला टक्कर देण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर होणे आणि अकोल्यासाठी डॉ. पाटलांची उमेदवारी ठरविणे या घडामोडींमुळे निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात असल्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Akola Lok Sabha Elections 2024 abhay patil
Akola Lok Sabha Elections 2024 abhay patil

डॉ. अभय पाटील संभाव्य उमेदवार यांचा संपूर्ण परिचय.

नाव : डॉ. अभय काशिनाथ पाटील
शिक्षण : (एम.बी.बी.एस. ऑर्थोपेडीक सर्जन) (M.B.B.S. Orthopedic Surgeon)
काँग्रेस पद : General Secretary Maharashtra Pradesh Congress Committee. President of Akola Hocky Committee.
जन्म तारीख : 20 जानेवारी 1965

गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. विघ्नहर्ता क्रिटीकल केअर चे व्यवस्थापकीय संचालक, अकोला. आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापकी संचालक, अकोला.

सामाजिक उपक्रम आणि कारकिर्द : आतापर्यंत 50000 शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. एम.आर.आय. सेंटरचे व्यवस्थपकी संचालक व लायेंन्स् क्लॅबचे माजी अध्यक्ष. अकोला आणि वाशिम मध्ये मराठा क्रांती मोर्चा संचोजन. 150 खाटांचे मल्टी स्पेशालिटी ऑयकॉन हॉस्पिटल सुरु केले. दरवर्षी भगतसिंग जयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते आणि 1000 ते 1200 बॉटल्यांची व्यवस्था केली जाते.

विद्यर्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात. संस्थापकी अध्यक्ष सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्ट. अकोला जिल्ह्यात पासपोर्ट शिबीर तयार लायब्ररी आणि पुस्तकांचे वितरण. गुन्हेगारांच्या पुनर्वसनावर काम करणे. अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य. वाशिम जिल्ह्यातील अनेक मंदिरे, सोनखास, रिठद. पंधरा जिम आखाडा आणि संस्कार केंद्राचे व्यवस्थापन केले. सुमारे 10 ते 15 हजार तरुणांची शिवजसंती आणि संभाजी महाराज जयंती आयोजित केली.

विद्यर्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात. संस्थापकी अध्यक्ष सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्ट. अकोला जिल्ह्यात पासपोर्ट शिबीर तयार लायब्ररी आणि पुस्तकांचे वितरण. गुन्हेगारांच्या पुनर्वसनावर काम करणे. अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य. वाशिम जिल्ह्यातील अनेक मंदिरे, सोनखास, रिठद. पंधरा जिम आखाडा आणि संस्कार केंद्राचे व्यवस्थापन केले. सुमारे 10 ते 15 हजार तरुणांची शिवजसंती आणि संभाजी महाराज जयंती आयोजित केली.

बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागत शिक्षणाच्या प्रेरणेसाठी शाळा स्थापना केल्या. रंग पिकर्ससाठी शाळा चालवल्या. मेडिकल चॅम्प आयोजित केले आणि रोजगार शिबिर आयोजित केले. वैद्यकिय माहविद्यालयात प्रवेश शिबिर आणि मार्गदर्शन सेमिनार, प्रेरक व्याख्यानाची मालिका. आयोजित करून ते प्रत्येकांच्या घराघरात पोहोचले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!