WhatsApp

Akola Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath योगी आदित्यनाथ यांची अकोल्यात होणार महासभा,? महायुतीची ताकद दाखवण्यास सज्ज

akola news whatsapp group
akola news whatsapp group

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १७ एप्रिल :-Akola Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या अकोला जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू झाली आहे. विरोधकांची मोठी नावे अद्याप संघात प्रचारासाठी आलेली नसतानाही, भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठ्या आघाडीची महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रविवारी दिनांक २१ एप्रिल रोजी अकोल्यात आगमन करणार असून त्यांची विशाल जनसभा आयोजित करण्यात आली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी लोहिया सेना, कुणबी सेना, मराठा क्रांति मोर्चा, रिपाई आठवले गट आणि कवाडे गटाची महायुती असून त्यांचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सभेला उपस्थित राहणार आहेत. Akola Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath

21 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता अकोला क्रिकेट क्लबमधील मैदानावर ही विशाल सभा Akola Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath होणार आहे. योगी यांच्या उपस्थितीमुळे महायुतीची संपूर्ण ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत. पार्किंग, सुरक्षा आणि इतर नियोजनाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून विविध व्यवस्था उभारण्यात येत आहेत.

कर्मठपणे, धर्माध्यात्म आणि कुशल नेतृत्वासाठी ओळखले जाणारे योगी हे “राष्ट्रचेतनेचे पुढारी” म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रखर वक्तृत्वामुळे अनेक राष्ट्रभक्त आणि मतदारांच्या मागणीस्तव ही सभा झाली आहे. योगींच्या सभेनंतर विरोधकांचे पुढील पावले काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मतदारसंघातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि महायुतीला Akola Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath अधिक बळ देण्यासाठी योगींची सभा निश्चितच महत्त्वाची ठरेल. अकोल्यातील निवडणूक रणभूमीवर ही सभा एक नवा वळण घेण्यास कारणीभूत ठरेल, हे निश्चित आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!