Akola Lok Sabha Election 2024 अकोला जिल्हा हॉट, उन्हाचा पारा चाळीशी पार उमेदवारांची चांगलीच दमशाक, घराघरांत पोहोचणारे प्रचार बिल्ले गेले कुठे? तंत्रज्ञानाच्या युगात प्रचारसुद्धा हायटेक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २० एप्रिल प्रतिनिधी गणेश बुटे :- Akola Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असताना प्रचाराच ज्वर तापला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ आरोप प्रत्यारोपाच्या धुरड्यात चांगलेच रंगात आहे.मतदारसंघात भेटीगाठी, सभा घेताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रचारासाठी सहा दिवस उरले असल्याने कुणाला भेटू, कुठे जाऊ, विरोधकांना कसा शहा द्यायचे या मध्ये उमेदवार गुंतलेले असुन आता स्थानिक कार्यकर्त्यांवरच भिस्त आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात Akola Lok Sabha Election 2024 अकोला पूर्व, अकोला पश्चिम,अकोट तेल्हारा,बाळापूर, मूर्तिजापूर, अशा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती आघाडी, महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी राजकीय पक्षांचे व अपक्ष उमेदवारांसह १५ उमेदवार रिंगणात आहेत. आता प्रचाराकरिता कालावधी कमी असल्याने उमेदवारांना मतदारसंघ पालथा घालण्याचे कठीण काम करायचे आहे. केवळ सहा दिवस प्रचाराचा कालावधी उरल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात प्रचारसुद्धा हायटेक झाल्याचे दिसून येत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल समाज माध्यमांचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. प्रचार म्हटला की ,Akola Lok Sabha Election 2024 पूर्वीसारखे हातात झेंडे, पत्रके किंवा वाहनांवर भोंगे लावणे आलेच; पण सध्या जमाना आधुनिक झाला असून, जुन्या पद्धतींसोबत सोशल मीडियाचाही कार्यकर्ते स्मार्ट फोनद्वारे वापर करू लागले आहे.

Akola Lok Sabha Election 2024
Akola Lok Sabha Election 2024

अकोला लोकसभा निवडणुकीत एकून १८ उमेदवार रिंगणात आहे. मात्र, खरी लढत महायुती,वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाकडून सभेवर भर दिला जात आहे. त्यात जिल्ह्याचा गेल्या मागील दोन दशकात विकास, महागाई, तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे मतदार तीव्र रोष व्यक्त करीत आहे. या निवडणुकीत छोट्या पक्षांना किती मते मिळतील, कोणकोणत्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे

प्रचारासाठी थेट बांधावर Akola Lok Sabha Election 2024
एरवी कुणाच्या सुख दुःखात न दिसणारे आता थेट शेतकऱ्यांचे बांधावर पोहचत आहेत. कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची घरे कार्यकर्ते शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत.प्रचाराची एकही संधी उमेदवार कार्यकर्ते यांच्याकडून सोडली जात नाही.

डिजिटल माध्यमातून प्रचारावर भर. Akola Lok Sabha Election 2024
आपले नाणे कसे खणखणत आहे हे विकास कामातून सांगण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करत आहे. अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी विविध मराठी ,हिंदी,गाण्याचा घोषवाक्य, आधारित प्रचार गीताचा वापर केले आहे.या गाण्याचे सोशल मीडियावर स्टेटस ठेऊन प्रचारावर भर देण्यात येत आहे.त्यामुळे मतदारांचे सोशल मीडिया वर निवडणुकीच्या संदेश ओसंडून वाहत आहे.

घराघरांत पोहोचणारे प्रचार बिल्ले गेले कुठे? Akola Lok Sabha Election 2024
दशकापूर्वी प्रचारासाठी गावागावात गाड्या, ऑटो यायचे. गल्ली गल्लीत धूळ उडवित शिरलेली गाडी दिसायची, गावभर गाडी फिरताना गाड्यांच्या मागे धावणारी लहान-लहान मुले असायची, गाड्यातून बिल्ले देणारी व्यक्ती, बिल्ले फेकणारी व्यक्ती, मग रस्त्यावर पडलेले बिल्ले वेचणारी, बिल्लेसाठी एकमेकांना मारहाण करणारी लहान मुले अशी दृश्ये बघणे आता दुर्लभ झाले आहे. निवडणुकीत सोशल मीडिया प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. सगळ्याच पक्षाचे नेते पदाधिकारी सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. याचा प्रभाव अनेक बाबींवर पडला आहे.

लहान मुलांमध्ये होती क्रेझ Akola Lok Sabha Election 2024
दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रचार करण्यासाठी गावात गाड्या यायच्या, गावातील गल्ली गल्लीत गावभर भोंगा वाजवत फिरायचे, भोंग्याचा आवाज ऐकायला आला की लहान मुले घरातून बाहेर पडून गाडीच्या मागे धावायचे, गाडीतील व्यक्तीला मुले दिसली की प्रचाराचे बिल्ले मुलांना द्यायचे, हे बिल्ले मुले व्यवस्थित जपून ठेवत होती. कुणाच्या घरी तर कोणी शाळेच्या दप्तरात सुट्टीच्या दिवशी बिल्ले घेऊन मुलांची मैफल जमत होती.

Akola Lok Sabha Election 2024
Akola Lok Sabha Election 2024

प्रचाराचे होते सोपे माध्यम Akola Lok Sabha Election 2024
मग सुरू व्हायचा बिल्ले खेळण्याचा खेळ, या खेळात मुले दंग होऊन जात होती. बिल्ले हा घराघरात जाणारे प्रचाराचे सोपे माध्यम असायचे, आता ते दिसेनासे झाला आहे. आताच्या मुलांना बिल्ले काय असते हे माहिती नाही. निवडणूक काळात आठ-दहा मित्र बिल्ले खेळांमुळे एकत्रित येऊन बसत होती. आता खेळही नाही.

निवडणूक लोकसभा असो किंवा विधानसभा असो प्रामुख्याने प्रचार सामग्री म्हणजे बिल्ले, स्टिकर होते. आता सोशल मीडियाच्या जमान्यात हे दिसणे दुर्मिळ झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, द्विटर आदींच्या माध्यमातून अँड्रॉइड मोबाइलव्दारे घराघरात निवडणुकीचा प्रचार करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!