WhatsApp

Akola Lok Sabha Election 2024 रामायण संस्कृतीचा गौरव करणारे डॉ. अभय पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांचा रामनवमी उत्सवात सहभाग

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १७ एप्रिल :- Akola Lok Sabha Election 2024 अकोल्यात रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांनी रामायण संस्कृतीचा गौरव केला. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी प्रभू श्रीरामाची महिमा गाजवली. रामायणातील मूल्यांचे महत्त्व विशद करत डॉ. पाटील म्हणाले की, दृष्टांचा नाश व सत्याची पुनर्स्थापना या भूतलावर करण्यासाठी भगवान श्रीरामाची महिमा अपरंपार आहे. प्रभू रामच जगाचे उद्धारक आहेत.

डॉ. पाटील यांनी “आधी पूजन श्रीरामाचे” या उक्तीप्रमाणे टिळक रोडवरील प्राचीन व ऐतिहासिक श्रीराम मंदिरात उपस्थित राहून प्रभू रामरायाचे दर्शन घेतले. यावेळी अनेकांनी त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. Akola Lok Sabha Election 2024 गांधी चौकातील राम उत्सव समितीच्या उत्सवातही त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि रामललाचे दर्शन घेतले.

सकाळी राजेश मिश्रा यांच्या श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीची स्कुटर रैलीही डॉ. पाटील यांनी पाहिली. या रैलीत आ. नितीन देशमुख, राजेश मिश्रा, मनोज बिसेन, मंगेश काळे, मुन्ना मिश्रा, तरुण बगेरे, नितीन मिश्रा, बोरकर आदींची उपस्थिती होती. Akola Lok Sabha Election 2024 संपूर्ण महानगरात रामायणाची महिमा साकार करणारी ही रैली डॉ. पाटील यांच्यासाठी आकर्षणाचा विषय होती.

Akola Lok Sabha Election 2024 सायंकाळी जठारपेठ परिसरातील राम उत्सवातही सहभागी होऊन डॉ. पाटील यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. महानगरातील ऐतिहासिक श्रीरामजत्रेत त्यांची उपस्थिती विविध मंडळांना कार्याची ऊर्जा देत होती. यावेळी श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Akola Lok Sabha Election 2024
Abhay Patil Akola Lok Sabha Election 2024

अशाप्रकारे डॉ. पाटील Akola Lok Sabha Election 2024 यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून रामायण संस्कृतीचा गौरव केला. त्यांनी प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. जनतेला रामायणाच्या मूल्यांबद्दल प्रबोधित करणारे डॉ. पाटील यांचे हे पवित्र प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!