WhatsApp

Akola Lok Sabha Election 2024 डॉ. अभय पाटील यांचा विजयी दौरा – शेतकरी आणि सर्व घटकांसाठी विकासाचे आश्वासन

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १६ एप्रिल :-Akola Lok Sabha Election 2024 महाविकास आघाडीचे अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांनी मतदार संवादासाठी अकोला जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दौरा केला. पंचगव्हाण, बेलखेड, हिवरखेड, बोरगाव आणि कानशिवणी येथे त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विजयाची शपथ घेतली.

माजी मंत्री अजहर हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एड. महेश गणगणे, विजय कौशल, शौकतअली शौकत व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत डॉ. अभय पाटील Akola Lok Sabha Election 2024 यांनी पंचगव्हाणमध्ये मतदार संपर्क अभियान राबवले. देशातील सर्व जाती-जमातींच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीने मोठे कार्य केले असल्याचे सांगत त्यांनी मोठ्या फरकाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर डॉ. पाटील यांनी बेलखेड, हिवरखेड गावांमध्येही प्रचार अभियान राबवले. रात्री बोरगाव मंजू आणि कानशिवणी येथेही मतदार संवादासाठी उपस्थित राहून तेथील नागरिकांशी संपर्क साधला. Akola Lok Sabha Election 2024 कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी सक्षम असून त्यांच्या शासनकाळात शेतकऱ्यांची सरसकट कृषी कर्जमाफी करण्यात आली होती. म्हणून विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

या मोहिमेदरम्यान महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व घटकांचा विकास घडवून आणण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले असून त्यासाठी मतदारांकडून पाठिंबा मागितला.

Leave a Comment

error: Content is protected !!