WhatsApp

Akola Lok Sabha Election 2024 अकोल्याचा खासदार ठरवला ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी ! २०१९ च्या तुलनेत टक्कात वाढ अन् आकडाही! हा मतदार संघ ठरणार गेम चेंजर कुणाचा फायदा कुणाचे नुकसान ?

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक २८ एप्रिल :- Akola Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काल २६ एप्रिल ला मतदान झाले. १४ उमेदवारांचे भाग्य आता मशीन बंद झाले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज २७ एप्रिलला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार यंदा २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असून अन् आकड्यातही वाढ झाल्याचे दिसले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर केवळ ५२.६९ टक्के मतदान झाले होते मात्र शेवटच्या १ तासात धो धो मतदान झाले.. त्या एका तासाच्या खेळामुळे ६१.७९ टक्के एवढी सन्मानजनक टक्केवारी गाठता आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५९,९८ टक्के इतके मतदान झाले होते.

सर्वात जास्त मतदान बाळापूर तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम Akola Lok Sabha Election 2024

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाळापूर मतदार संघात सर्वाधिक मतदान झाले बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.58 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाल्याची प्रशासनाने दिली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यावेळी अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

नवमतदारांमध्ये विशेष उत्साह होता. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी शनिवार, 27 एप्रिल रोजी प्रशासनाने घोषित केली. यात सर्वाधिक मतदान बाळापूर विधानसभा मतदारसंघात 66.58 टक्के तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाले आहे.

शेवटच्या तासात बदलला गेम आणि वाढली टक्केवरी Akola Lok Sabha Election 2024

काल झालेल्या मतदानाच्या शेवटच्या काही तासात तासात मतदान वाढले. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची गती धीमी अन चिंताजनक ठरली. उमेदवार, राजकीय पक्ष नेतेच नव्हे जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा देखील अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान केवळ ५२.६९ टक्के मतदान झाले होते त्या नंतर मात्र अचानक मतदारांचा जोर वाढला यामुळे शेवटच्या ५ ते ६ या तासाच्या कालावधीत फार तर ५९ ते ६० टक्के मतदानाचा भल्याभल्यांचा अंदाज होता. मात्र तो चुकीचा ठरवत एका तासांत मतदारांनी मतदान करीत ही टक्केवारी ६१.७९ टक्यावर नेवून सुखद धक्का दिला. अनेक ठिकाणी रात्री साडेसात ते आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया चालली. यामुळे मतदानाची टक्केवारी तब्बल ६१.७९ टक्केपर्यंत गेली असून मतदारांनी मतदान करून जिल्ह्याची शान राखली.

Akola Lok Sabha Election 2024 विधानसभा निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे

अकोट :- 64.02

बाळापूर :- 66.58

अकोला पश्चिम :- 54.87

अकोला पूर्व :- 59.36

मूर्तिजापूर :- 64.52

रिसोड :- 62.43

अकोला लोकसभा मतदार संघात ऐकूण 61.79 मतदान झाले असून लोकसभा मतदारसंघात गतवर्षीच्या तुलनेत मतदानात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. अकोला जिल्ह्यात तिरंगी लढत झाली असून आप आपला उमेदवार निवडून येणार असल्याची पक्की खात्री त्या त्या पक्षाचे उमेदवार देत आहेत. ४ जून रोजी लोकसभा Akola Lok Sabha Election 2024 निवडणुकीचा निकाल लागणार असून आता सगळ्यांना कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याचे वेध लागले आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाळापूर मतदार संघात सर्वाधिक मतदार झाले असून हाच मतदारसंघ गेम चेंजर ठरणार असे सांगणे वावगे ठरणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!