WhatsApp

अकोला ग्रामपंचायत निकाल हाती कोणाचा उडाला गुलाल कोणाची झाली हार पहा सविस्तर बातमी Akola GramPanchayat Result

अकोला न्युज डेक्स अनुराग अभंग अकोला :- Akola GramPanchayat Result अकोला जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचासह 52 जागांसाठी सार्वत्रिक तर 6 ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार काल आटोपली असून आज या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे.

Akola GramPanchayat Result जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित व सन् 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचत सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे….

त्यानुसार रविवार 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 14 सरपंच तर 106 सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली यामध्ये नऊ सदस्यांच्या जागेवर एकही उमेदवारी अर्ज आला नाही तर 45 सदस्य बिनविरोध झाले आहे…. Akola GramPanchayat Result त्यामुळे प्रत्यक्ष 52 सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून 13 ठिकाणी थेट सरपंचाची निवडणूक होणार आहे….!

असून आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तो खालील प्रमाणे Akola GramPanchayat Result

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निकाल : निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायत : 14
अविरोध : 01

अकोला तालुका :
एकूण ग्रामपंचायत : 04

1) कापशी : वेणूताई उमाळे : भाजप
2) काटीपाटी : संगिता कासमपुरे : वंचित
3) एकलारा : राजेश बेले : स्थानिक आघाडी
4) मारोडी : पुजा वाघमारे : स्थानिक आघाडी

बार्शीटाकळी तालुका :
एकूण ग्रामपंचायत : 04

1) खोपडी : काँग्रेस
2) दोनद खुर्द : सागर कावरे : राष्ट्रवादी शरद पवार गट
3) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
4) जांभरून : काँग्रेस

मूर्तिजापूर तालुका
एकुण ग्रामपंचायत : 02

1) घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित
(भाजप नेते माजी राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे गाव)
2) गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले : वंचित

पातूर तालुका
एकूण ग्रामपंचायत : 01

1) कोसगाव : रत्नमाला करवते : राष्ट्रवादी अजित पवार गट

तेल्हारा तालुका
एकूण ग्रामपंचायत : 03

1) बारूखेडा : श्यामलाल कासदेकर : अविरोध : वंचित
2) पिंपरखेड : गोपाल महारनर : प्रहार जनशक्ती पक्ष
3) झरीबाजार : जाहेरुन खातून : काँग्रेस

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणुक अंतिम निकाल

वंचित : 04
काँग्रेस : 03
स्थानिक आघाड्या : 02
राष्ट्रवादी शरद : 02
भाजप : 01
राष्ट्रवादी अजित : 01
प्रहार जनशक्ती पक्ष : 01

एकूण ग्रामपंचायती : 14
निकाल जाहीर : 14

Leave a Comment

error: Content is protected !!