अकोला न्युज डेक्स अनुराग अभंग :- Akola Farmer News यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली. दरम्यान आता परतीचा पासून न बरसल्याने रब्बी पिकाच्या पेरणी बाबत शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसाने दांडी मारल्याने जिल्यातील रब्बी हंगामा मधील पेरण्या खोळंबल्या असून जिल्ह्यात जेमतेम 11 टक्के पेरण्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, Akola Farmer News जिल्हा परिषद कृषी विभागाने रब्बी हंगाम मधील पेरणी चे नियोजन पूर्ण केले असून बळीराजाला मात्र रब्बी ची पेरणी नेमकी कधी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्यात खरीप हंगाम मधील पीक काढणी झाल्यावर शेतकरी वर्ग हा रब्बी च्या तयारीत लागला आहे, मात्र यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने आपली पाठ फिरवल्याने जमिनीमधील ओल अत्यंत कमी असल्याने रब्बी च्या पेरण्या संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे, Akola Farmer News जिल्ह्यात आता पर्यंत फक्त 11 टक्के रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत 1 लाख 42 हजार 530 हेक्टर शेतीचे रब्बी पिकाच्या पेरणी साठी नियोजन करण्यात आले असून या करिता 45 हजार 770 मेट्रिक टन खताचे आवंटन प्राप्त झाले आहे.
या पैकी 4 हजार 623 मेट्रिक टन खत जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. खरीप हंगाम मधील तसेच शासनाकडून प्राप्त खत साठ्या पैकी सध्या 24 हजार 268 मेट्रिक टन खत कृषी विभागाकडे उपलब्ध आहे, Akola Farmer News याच बरोबर रब्बी च्या पेरणी करिता गहू, हरबरा तसेच ज्वारी या बियाण्या ची 55 हजार 876 क्विंटल ची मागणी शासनाकडे करण्यात आली असून या पैकी 34 हजार 522 क्विंटल बियाण्याचा साठा उपलब्ध असून देखील बाजारपेठ मध्ये मात्र शेतकऱ्यांकडून बियाण्याची किरकोळ स्वरूपात विक्री होत आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी जवंजाळ यांनी दिली.