अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३० जुलै २०२४ संतोष माने रिपोर्टर मूर्तिजापूर :- Akola Crime News अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरात विदेशी चलनाची हेराफेरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, कर्नाटक या परप्रांतातून आलेल्या आरोपींनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विदेशी चलनाची हेराफेरी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत Akola Crime News चिखली गेट रोड स्थित शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरात छापा टाकला. या कारवाईत तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आणि दोन पुरुष व तीन महिलांना अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी दर्यापुर पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले, तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, या टोळीत १२ महिला व पुरुषांचा समावेश आहे, त्यात तीन महिला व अन्य पुरुष आरोपी असल्याचे समजते. मुख्य सुत्रधार फिरोज अद्यापही फरार आहे, आणि त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांनी पंचशील वाडी येथील अन्य परप्रांतीयांचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत मुर्तिजापूर पोलीस अनभिज्ञ असल्याची माहिती पुढे आली आहे.
Akola Crime News पुढील तपासासाठी अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे, हवालदार संतोष पाईकराव, गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेश बिंबेकर, शेरू गारवे, खोलेश्वर खोपसे हे या तपासात सामील आहेत.