WhatsApp


Akola Crime News अकोल्यातील केडीया दरोड्या प्रकरणी २१ गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगारास अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ५ जुलै २०२४:- Akola Crime News २८ जून रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक नंदकिशोर अमृतलाल केडिया यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना ताजीच घडली आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी त्वरित कारवाई करत २ जुलै रोजी मुख्य आरोपी सह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. तर आज या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार हेमंत लुनियालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Akola Crime News अकोला पोलिसांना दरोडेखोरांकडून आव्हान
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय जवळच असलेल्या आळशी प्लॉट परिसरात दरोडा पडल्याने या घटनेने खळबळ उडाली होती. या दरोडेखोरांनी जणू अकोला पोलिसांनाच आव्हान देत हे कृत्य केल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास सुरू केला होता.

Akola Crime News तपास आणि आरोपींची अटक
पोलीस उपनिरीक्षक मुकूंद देशमुख आणि पोलीस हवालदार निलेश खंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारावर २ जुलै रोजी प्रकरणातील मुख्य आरोपी पुष्पराज याला सुरत येथून अटक केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस गणवेश धारण करून दरोडा टाकणाऱ्या विनायक उर्फ विक्की दिलीप देवरे आणि सचिन अशोक शहा यांना अटक केली.

Akola Crime News हेमंत लुनियाची अटक
यानंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हेमंत लुनिया फरार होता. त्याच्यावर मध्यप्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोलवरून फरार राहणे असे २१ गुन्हे दाखल आहेत. २८ जून रोजी झालेल्या दरोड्यातील इतर आरोपी अटक झाल्याची माहिती मिळाल्यावर हेमंत लुनियाने आपले दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याला अटक करणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले होते.

Akola Crime News अखेरीस यशस्वी पोलिस कारवाई
मात्र अकोला पोलिसांनी हार मानली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हेमंत लुनियाचा तपास करत त्याचा मागोवा घेतला आणि अखेरीस आज त्याला अटक करण्यात यश मिळाले. त्याच्याकडून दरोड्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती ईस्टीगा कार क्रमांक MP-09-ZM-8468 देखील जप्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!