WhatsApp

Akola Crime Double murder अकोला शहरात मध्यरात्री दोन हत्या! रेल्वे स्टेशन जवळ तरुणावर धारधार शस्त्राने वार, भवानी पेठेत तरुणाची गळ्यावर वार करून हत्या!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १८ एप्रिल :- Akola Crime Double अकोला शहरात मध्यरात्रीच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या निर्दयी हत्यांनी शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमध्ये तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. Akola Crime Double

पहिली हत्या:Akola Crime Double

Akola Crime Double पहिली हत्या रेल्वे स्टेशनच्या मुख्य चौकातील गुजराती उपहार गृहसमोर घडली. या हत्येत अकोट फाईल परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवासी अतुल रामदास थोरात नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीचा धारधार शस्त्राने भोसकून मृत्यू झाला. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास अतुल हे आपली दुचाकी घेऊन घरी जात असताना त्यांना तीन अज्ञात इसमांनी थांबवले आणि Akola Crime Double murder त्यांच्यासोबत वाद घातला. वाद तीव्र झाल्यावर आरोपींनी अतुल यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अतुल यांना नागरिकांनी तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

Akola Crime Double
Akola Crime Double

दुसरी हत्या: Akola Crime Double

अर्ध्या तासाच्या आतच दुसरी हत्या भवानी पेठेतील देशमुख फाईल जवळील एका घरासमोर घडली. Akola Crime Double murder या हत्येत राज संजीव गायकवाड नावाच्या 18 वर्षीय तरुणाचाही धारधार शस्त्राने भोसकून मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, आज रामनवमी निमित्त शहरात सायंकाळच्या सुमारास रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीत राजू गायकवाड हा देखील गेला होता. या मिरवणुकी दरम्यान राजूचा वाद देशमुख फाईल परिसरातील काही युवकांशी झाला होता. मात्र हे प्रकरण मित्रांच्या मदतीने तेथेच निपटवण्यात आले.

परंतु, रात्री 2 वाजताच्या सुमारास राजूच्या घरी तीन अज्ञात इसमे आले आणि त्यांना घराबाहेर बोलावले. राजू घराबाहेर आला असता आरोपींनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. राजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले. राजूला तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास: Akola Crime Double

Akola Crime Double murder या दोन्ही घटनांचा रामदासपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही घटनांमध्ये तिन्ही आरोपी समान असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी त्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचे तार सुरू केले आहेत. या निर्दयी हत्यांमुळे अकोलकर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिरिक्त माहिती: Akola Crime Double

  • दोन्ही हत्या घटनांमध्ये वापरले गेलेले शस्त्रे अद्याप सापडलेले नाहीत.
  • पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या माहितीच्या आधारावर तपास सुरू केला आहे.
  • अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या प्रकरणाची त्वरित आणि कठोर तपासणी करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Akola Crime Double murder पोलिसांकडून आ आरोपींचा लवकरच शोध लागेल असा दावा केला जात असला तरी नागरिकांमधील भीती कायम आहे. अशा घटनांमुळे नागरिक सुरक्षेची अधिक गुंतागुंत होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सुरक्षेसाठी आवश्यक ती कठोर उपाययोजना करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान राहिले आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याचा धोका कायम तर राहणारच मात्र अकोलेकराना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे देखील भीतीदायक ठरणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

Leave a Comment

error: Content is protected !!