WhatsApp

Akola Crime सहकार नगर बंगल्यात लाखो रुपयांची चोरी! पोलिसांसमोर आव्हान!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ४ मे :- Akola Crime काल रात्रीच्या उशिरा, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगरमधील एका बंगल्यात जबरी चोरी केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघड झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मौल्यवान माल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीमुळे खदान पोलीस ठाण्याच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उच्चभ्रू परिसरात चोरीची घटना:Akola Crime
अकोला शहरातील सर्वात श्रीमंत परिसरांपैकी एक मानला जाणारा गौरक्षन रोड अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांसाठी कुख्यात झाला आहे. याच रस्त्यावरील सहकार नगरमधील श्री. भारतीय यांच्या आलिशान बंगल्यावर काल रात्री चोरट्यांनी धाडसीपणे चोरी केली.

Akola Crime पोलिसांचा ताफा घटनास्थळी:
घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांनाही तात्काळ बोलावण्यात आले. या वरून चोरी मोठी असल्याचा अंदाज लावला जातो

Akola Crime मुद्देमाल अंदाज आणि तपास:
बंगल्याच्या मागील बाजूस शिडी व दागिन्यांचें खाली बॉक्स मिलीं आल्याने प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे मुद्देमाल, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. चोरीचा अंदाजे किती माल लंपास झाला आहे याची माहिती अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे दिली नाही.

सीसीटीव्ही फुटेज आणि पुढील तपास: Akola Crime
घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातून चोरट्यांच्या संभाव्य हालचालींचा आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

शहरातील नागरिकांमध्ये भीती: Akola Crime
शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेने खदान पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांनी तात्काळ पोलिसांनी कठोर कारवाई करून चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे.

पोलीसांचे आश्वासन: Akola Crime
पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरच ताब्यात घेण्याचे आणि त्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे.

हे प्रकरण अकोला शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून नागरिकांना सुरक्षितता देण्याची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!