WhatsApp


Akola News त्या “टपऱ्या गावगुंडाच्या” मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, तडीपार गुंडाला पातूर पोलिसांकडून अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १० ऑक्टोंबर पातूर :- एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार असलेल्या आरोपीने अनाधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करून पातूर शहरातील रहिवासी असलेल्या शिवसेना (उ.बा.ठा.) उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांच्या घरी जाऊन 50,000 रुपयांची खंडणी मागितली होती.त्यानंतर दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सागर रामेकर यांच्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आरोपी शिवम उर्फ शिवा दत्तात्रय निलखन रा. शिर्ला याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अनव्ये कलम 308 (4) नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,

त्या अगोदरसुद्धा पातूर शहरातील राजकिय व सामाजिक क्षेत्रात आपल्या चांगुलपणामुळे नावलौकिक मिळवून नवतरुणांच्या मनात आपले स्थान मिळविणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला केला होता त्यासंदर्भात देखील त्याच्यावर पातूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तेंव्हापासून हा फरार होता.

दरम्यान या घटनेला आज तब्बल दोन महिने ओलांडले होते तरीदेखील सदर आरोपीचा शोध घेण्यात पातूर पोलिसांना यश आले नव्हते व अनेक प्रकारच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी असलेला सराईत गुन्हेगार शिवा निलखन मोकाटपणे फिरत होता.

मात्र पातूर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष देऊन सदर आरोपीचा तपास सुरू केला असता काल दि.9 ऑक्टोबर 2024 च्या रात्री सुमारे दीड वाजताच्या दरम्यान फरार आरोपी शिवा निलखन हा त्याच्या राहत्या घरी शिर्ला येथे असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली असता पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे, मेजर संबोधी इंगळे, श्रीकांत पातोंड यांनी मोठ्या शिताफीने सिनेस्टाईल पद्धतीने सदर “टपऱ्या गावगुंड” शिवा निलखन यास अटक केली

पातूर शहरासह तालुकभरातील जनतेची मनं जिंकून खाकी आपल्या कर्तव्यात किती तत्पर असते हे आज पातूर पोलिसांनी दाखवून दिले आहे. दरम्यान एम.पी.डी. ए. कायद्याच्या अधीन राहून पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी सदर आरोपीची जेल रवानगी केली असून पुढील कार्यवाही जिल्हा प्रशासन करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!