WhatsApp

Akola Crime तुम्हीच सांगा शिकवावं वाटेल काय पोरीला? : मूर्तिजापूरमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराची दुर्दैवी घटना

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो, २७ ऑगस्ट, संतोष माने प्रतिनिधी :- Akola Crime मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. एका विद्यार्थिनीने धमकी आणि ब्लॅकमेलिंगच्या जाचामुळे विष प्राशन केले आहे. सध्या तिच्यावर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, हे विशेष चिंता निर्माण करणारे आहे.

Akola Crime नेमकं काय घडलं?
२४ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. या घटनेच्या आधी, तिला धमकावून मारहाण करून तिच्यासोबत फोटो काढले गेले होते. या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल केले जात होते. गावातील एकट्या घरात राहत असलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबाला काहीच सांगितले नाही. ती सतत सुन्न राहू लागली होती. अखेर, तिने घरातील फवारणीसाठी आणलेले गॅसपॉइझन कीटकनाशक प्राशन केले.

Akola Crime वडिलांचे शब्दांतून व्यक्त झालेला संताप
युवतीच्या वडिलांनी मुलीच्या मानसिक स्थितीचे वर्णन करताना सांगितले की, “माझी मुलगी फार हुशार होती. कुणाच्याही देण्याघेण्यात नाही. गावातील इतर मुलींमध्येही तिनेच शिक्षणात बाजी मारली होती. मात्र, गावातील एका तरुणाने तिला धमकावून मारहाण करत तिच्यासोबत फोटो काढले. ती घाबरली होती. ती रोज सुन्न राहायची. आम्हाला वाटले की तिला अभ्यासाचं टेन्शन आहे, पण नंतर आम्हाला कळलं की ती टॉर्चरमुळे तणावात होती.”

Akola Crime युवतीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, “माझी मुलगी कीटकनाशक घेतल्यानंतर तिला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना तिने गाडीत तिच्या दुःखदायक अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की ती विष प्राशन केल्याने तिच्या अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होईल. आम्हाला आता कसे शिकवायचे पोरीला? जर असे अत्याचार होत राहिले तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”

Akola Crime पोलिसांची निष्क्रियता आणि तपासाची गरज
या घटनेनंतर युवतीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तीन दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाणे, माना पोलिस ठाणे, आणि शहर पोलिस ठाणे या तिन्ही ठाण्यांना या घटनेची माहिती नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार कसा आणि का घडला, याचा तपास अद्याप सुरू नाही. मग जबानी बायान घेण्यास आलेला तो पोलीस करचारी कोण? त्याने बायान घेतले तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती का नाही? या सर्व परिस्थितीत युवतीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली असून तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

Akola Crime तपासासाठी पुढील पाऊल
युवतीच्या वडिलांनी सांगितले की, तिच्या मोबाइलमध्ये संबंधित युवकाचे सहा कॉल आहेत, ज्याच्या माध्यमातून ती ब्लॅकमेल केली जात होती. पोलिसांनी आता या घटनेचा तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी कुटुंबीयांची मागणी आहे.

Akola Crime युवतीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर त्यांना न्यायासाठी मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. “आम्हाला आता पोरीला कसे शिकवायचे? जर असे अत्याचार होत राहिले तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल,” असे ते उद्विग्नतेने म्हणाले.

Akola Crime न्यायाची प्रतीक्षा
आता, पोलिस आणि न्याय यंत्रणांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा करावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. महिलांवरील अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

Akola Crime सर्वच पातळ्यांवर महिलांच्या सुरक्षेसाठी सजगता राखणे हे समाजाचे आणि प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे. या दुर्दैवी घटनेने समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन महिलांच्या सुरक्षेसाठी एकजूट दाखवण्याची गरज आहे.

आपल्याकडे काहीही सदर गाव आपल्या हद्दीत येते. मात्र, आमच्यापर्यंत माहिती नाही कोणतीही माहिती नाही किंवा तक्रार नाही. माहिती आल्यावर सांगतो असे म्हणणे मना पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे आहे- सूरज सुरोशे, ठाणेदार माना पोलिस ठाणे.

Leave a Comment

error: Content is protected !!