अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक १८ मार्च २०२४ :- Akola Crimr रामदास पेठ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून आज दिवसभरात दोन धडाकेबाज कारवाई केल्याने आरोपींचे धाबे दणाणले आहेत पहिल्या कारवाई ८ गोवांशाना जीवनदान दिले तर दुसऱ्या धडाकेबाज कारवाईत महिलेच्या पर्स हिसकावून पळून जाणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली.
चोर हे कितीही शातिर असेल तरी पोलीस त्यांना पकडतच आपला अभ्यास व अनुभवाच्या जोरावर पोलिसांच्या कारवाईला लेट होते पण कारवाई मात्र थेट होते याची प्रचिती रामदास पेठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक मनोज बहुरे यांनी करून दिली आहे. आज सकाळच्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी ८ गोवंशना जीवनदान देऊन ७ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला तर लगेचच दुसरी धडाकेबाज कारवाई करत दोन अट्टल चोरट्यांना देखील अटक केली.
सविस्तर वृत्त असे की रामदास पेठ पोलिस स्टेशन मधे १६ मार्च रोजी श्रीमती. सुशीला ब्रिजलाल झुनझुनवाला, वयः-७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला. यांनी दि. १६ मार्च रोजी पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथे तक्रार दखल केली की त्या दिनांक दोन मार्च रोजी आपल्या मैत्रिणी सोबत सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात पायी फिरत असतांना एका खाजगी शिकवणी वर्गा समोरील रोडवर एक तीन चाकी सवारी ॲटा येवुन उभा झाला व त्यामधुन दोन अनोळखी इसम खाली उभरले व त्यांनी जवळ येवुन माझ्या हातातील पर्स जबरीने हिसकावुन चोरुन नेली ज्यामध्ये मोबाईल नगदी व काही किमती वस्तू होत्या
सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहता रामदास पेठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तत्काळ आपली यंत्रणा कामाला लावली येथील सी सी टीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांना दोन संशयित व्यक्तींची ओळख पटली व त्यांनी कार्तिक योगेश लाखे वय २१ वर्ष रा. रमेश नगर, डाबकी रोड, पावर हाउस जवळ अकोला व गणेश गोपाल नावकार वय २१ वर्ष रा. विर लहुजी वस्ताद नगर खोलेक्ष्वर अकोला यांना अटक करुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे देखील अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे देखील कबूल केले
या आरोपी कडून गुन्हयातील एक मोबाईल फोन कि.अ. १५०००/रु एक तीन चाकी सवारी अॅटो कि.अ. १०००००/रुव ४० नग सोन्याचे मनी व एक सोन्याचे पेंडाल एकुण असा एकुण १ लाख ४८ हजार ७७०/रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. सदरचा गुन्हयाचा तपास अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला शहर सतिष कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनात रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड सह पोलीस उपनिरीक्षक सदाशिव सुळकर, शेख हसन शेख अब्दुल्ला, तौहीद अली काझी श्याम मोहळे यांनी केली.