WhatsApp


Akola Crime मदरसात अल्पवयीन मुलास जबरी मारहाण, मौलानासह दोघांविरोधात गुन्हे दाखल

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक :- २८ जुलै २०२४ :- Akola Crime अकोला शहरातील अकोट फैल परिसरातील दारूल उलूम मदरसा येथे धार्मिक शिक्षणाकरिता दाखल करण्यात आलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलास जबरी मारहाण करून धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली.

याप्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये मौलानासह दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली तर दुसऱ्या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

akola news whatsapp group
akola news whatsapp group

शेगाव येथील एका 42 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला दीड वर्षांपूर्वी दारूल उलूम मदरसा अकोट फैल, अकोला येथे धार्मिक शिक्षणाकरिता दाखल करण्यात आले होते. Akola Crime याठिकाणी धार्मिक शिक्षण घेत असताना मदरसातील शिक्षकाने मुलाला काठीने बेदम मारहाण केली

त्या मुळे घाबरलेल्या या बालकाने स्वतःच्या घरी फोन करून मला घरी घेऊन जा, असे 25 जुलै रोजी आईला फोनद्वारे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून घरी घेऊन जाण्याची मुलाने विनंती केली. यादरम्यान मुलाला घरी घेऊन गेले असता मुलाला त्याच्या आई वडिलांना घडलेली आपबिती कथन केली.

मदरसा येथील मौलाना सैयद हमीद यांनी 23 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास लाकडी काठीने मारण्याचा धाक दाखवून Akola Crime ‘मदरसाचे पूर्वीचे शिक्षक मुजाहिद हे गुटखा आणण्यासाठी मदरसा बाहेर पाठवीत होते’ असे बोलायला सांगितले. मुलाने असे बोलण्यास नकार दिल्याने मौलाना सैयद हमीद यांनी लाकडी काठीने मुलास मारहाण केली.

परत दुसऱ्या दिवशी 24 जुलै रोजी सकाळच्या सुमारास मौलाना हम्माद, मौलाना हाफिज आकीब यांनी या मुलास मारहाण करून ‘आम्ही जसे सांगतो, तसे मोबाईल समोर बोल, नाहीतर आम्ही तुला मारू’ Akola Crime असे सांगितले. त्यामुळे पुन्हा मारण्याच्या धाकाने मुलाने ‘ मौलाना मुजाहिद हे मुलांना गुटखा पुड्या आणावयास सांगतात व खातात’ असे मोबाईल समोर सांगितले.

त्यानंतर मौलाना हाफिज आकीब यांचा मोबाईल मागून मुलाने घरी कॉल करून मारहाण झाल्याचे घरी सांगितल्याने मौलाना हम्माद यांनी काठीने पार्श्वभाग व पायांच्या मांड्यावर मारहाण केली. तसेच सायंकाळी मौलाना हम्माद व हाफिज रेहान यांनी स्कुटीवर बसवून रेल्वे पुलाच्या पुढे असलेल्या एका पोलीस स्टेशनच्या आवारात नेऊन ‘तू मारहाण केल्याचे कोणाला Akola Crime सांगितले तर तुझ्या आई वडिलांना या पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये टाकू’ अशी धमकी दिली आणि पुन्हा मदरसामध्ये आणले. व पुन्हा मारहाण करण्यात आली. असे मुलाने आईवडिलांना आपबितीत कथन केले.

याप्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशनला Akola Crime दिलेल्या फिर्यादीनुसार, मौलाना हम्माद, हाफिज आकीब दोन्ही रा. दारूल उलूम मदरसा अकोट फैल यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118 (2), 351(2) 3 (5) अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 कलम 75 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच आरोपी फरार झाले होते मात्र घटनेचे गांभीर्य Akola Crime पाहता अकोटफैल पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून दुसऱ्या फरार आरोपीचा पोलीस कसून तपास करीत असून याप्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!