अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १४ जुलै २०२४: Akola Crime अकोला शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी रात्री एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाला होता आणि आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील अती वर्दळीच्या वाशीम बायपासवरील मुख्य चौकात घडली. Akola Crime अफरोज खान मनवर (वय ३२) यांच्यावर एका अज्ञात तरुणाने शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला.
हल्ल्यात जखमी झालेल्या अफरोज यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने जुने शहर पोलिसांनी तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. Akola Crime
या घटनेनंतर जुने शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी अफरोज यांच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी प्राथमिक तपासात अफरोज आणि आरोपी यांच्यात काही वाद झाला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, या वादाचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अकोला शहरातील गुन्हेगारी वाढीला अंकुश घालण्यासाठी पोलिसांनी त्वरित आणि कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गस्ती वाढवणे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.